Dr. Vinayak Kale Sarkarnama
पुणे

Sasoon Hospital : ड्रग्ज प्रकरणानंतर 'ससून'चे डीन म्हणून पुन्हा डॉ. विनायक काळे

Drugs Case Sasoon Pune : डॉ. संजीव ठाकूर यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश लवकरच

Sunil Balasaheb Dhumal

Pune News : पुण्यातील ससून रुग्णालयाच्या इतिहासात ड्रग्ज प्रकरणाने काळा डाग लागला आहे. याचा परिणाम सध्या रुग्णालयाच्या डीन पदावर होताना दिसत आहे. या पदावरून दीड वर्षापूर्वी हटवलेल्या डॉ. विनायक काळे यांची पुन्हा एकदा रुग्णालयाचे प्रभारी डीन म्हणून वर्णी लागली आहे. उच्च न्यायालयाच्या आदेशाने डॉ. काळे यांच्या वर्णीवर शिक्कामोर्तब झाला आहे.

डॉ. विनायक काळे यांची जानेवारी २०२३ मध्ये डीन म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यानंतर प्रशासकीय बदलीत त्यांची वर्णी महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदी करण्यात आली. या बदलीनंतर काळे यांच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. त्यावर निकाल देताना न्यायालयाने डॉ. काळे यांच्याकडे ससून रुग्णालयाच्या अधिष्ठाता पदाचा तात्पुरत्या स्वरूपात पदभार देण्यास मान्यता दिली आहे. त्यानुसार डॉ. काळे आता ससूनचे प्रभारी डीन म्हणून काम पाहणार आहेत.

दरम्यान, ठाकूर यांच्यानंतर ससून रुग्णालयाच्या डीनपदी संस्थास्तरावर तात्पुरत्या स्वरूपात सेवाज्येष्ठ प्राध्यापकांकडे सोपविण्यात आला होता. आता तात्पुरता कार्यभार संपुष्टात आणून डॉ. विनायक काळे यांच्याकडे हे पद सोपवण्यात आले आहे, तर डॉ. संजीव ठाकूर यांच्या नियुक्तीबाबतचे आदेश लवकरच देण्यात येतील, असेही या वेळी म्हटले आहे. ललित पाटील ड्रग्ज प्रकरणात मलिन झालेली ससूनची प्रतिमा उजळण्याचे मोठे आव्हान आता डॉ. काळे यांच्यासमोर असणार आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

डॉ. काळे यांची जे. जे. रुग्णालयातील उपअधिष्ठाता पदावरून पदोन्नतीने दीड वर्षापूर्वी ससूनच्या अधिष्ठातापदी रुजू झाले होते. मात्र, तीन वर्षांतच त्यांची 13 जानेवारी रोजी तडकाफडकी बदली करण्यात आली. त्यांच्या जागी संजीव ठाकूर यांची ससूनच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली. महिनाभरापूर्वी ससूनच्या प्रवेशद्वाराजवळ तब्बल 2 कोटी 14 लाख रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्यात आले होते. ड्रग्स तस्कर ललित पाटील फरार झाला होता. यानंतर ससूनचा वॉर्ड क्रमांक १६ आणि ससूनचे संजीव ठाकूर वादग्रस्त ठरले.

(Edited by Sunil Dhumal)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT