Sasoon Hospital News : ड्रग्ज रॅकेटमुळे चर्चेत आलेल्या संजीव ठाकूरांना 'मॅट'चा मोठा झटका, हे असणार ससूनचे नवे 'डीन'

Pune News : आता मॅटने संजीव ठाकूरांची नियुक्ती रद्द करत...
Sasoon Hospital News
Sasoon Hospital NewsSarkarnama

Pune : पुणे शहरात काही दिवसांपूर्वी धक्कादायक प्रकार घडला होता. शहरातील ससून रुग्णालयात ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश करण्यात आला होता. त्यामुळे ससून रुग्णालय चांगलेच चर्चेत आले होते. याचवेळी या ड्रग्ज रॅकेटनंतर अधिष्ठाता तथा डीन डॉ. संजीव ठाकूर यांच्यावरदेखील गंभीर आरोप करण्यात आले होते. या आरोपांनंतर ठाकूर अडचणीत आले होते. आता 'मॅट'ने ठाकूरांबाबत महत्त्वपूर्ण निर्णय दिला आहे.'मॅट'ने ठाकूरांची नियुक्ती रद्द करत डॉ. विनायक काळे यांची 'डीन' म्हणून नियुक्ती केली आहे.

तत्कालीन अधिष्ठाता डॉ. विनायक काळे यांची अचानक बदली करण्यात आली होती. या बदलीविरोधात काळे यांनी महाराष्ट्र प्रशासकीय न्यायाधिकरणाकडे (मॅट) दावा दाखल केला होता. आता मॅटने संजीव ठाकूरांची नियुक्ती रद्द करत डॉ. काळे यांची पुन्हा अधिष्ठातापदी नियुक्ती करण्याचे आदेश दिले आहेत. मॅटचा हा निर्णय म्हणजे ड्रग्ज रॅकेटमुळे आधीच चर्चेत आलेल्या ठाकूर यांना मोठा धक्का मानला जात आहे.

Sasoon Hospital News
Sambhaji Raje : अन् संभाजीराजे एकदम म्हणाले, ''मला मुख्यमंत्री करा, मी...''

डॉ. विनायक काळे यांची दीड वर्षापूर्वी ससूनच्या (Sasoon Hospital) अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली होती. मात्र, कार्यकाळ पूर्ण होण्याच्या आधीच जानेवारीमध्ये त्यांची अधिष्ठातापदावरून बदली ससून रुग्णालयातील महाराष्ट्र मानसिक आरोग्य संस्थेच्या संचालकपदी करण्यात आली होती.

याचवेळी अधिष्ठातापदी डॉ. संजीव ठाकूर (Sanjeev Thakur) यांची नियुक्ती करण्यात आली होती. ते त्यावेळी सोलापूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात अधिष्ठाता म्हणून जबाबदारी सांभाळत होते, तर काळे यांची जे. जे. रुग्णालयाच्या उपअधिष्ठातापदावरून दीड वर्षापूर्वी ससूनच्या अधिष्ठातापदी नियुक्ती करण्यात आली होती.

आता या प्रकरणी उच्च न्यायालयाने महत्त्वपूर्ण निर्णय देताना संजीव ठाकूर यांची ससून रुग्णालयातील अधिष्ठातापदी करण्यात आलेली नियुक्ती रद्द केली आहे. तसेच डॉ. काळे यांना अधिष्ठातापदी नियुक्त करण्याचे आदेश दिले आहेत.

पुण्यातील ससून रुग्णालयात ड्रग्ज रॅकेट उघडकीस आल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. या प्रकरणातील मुख्य आरोपी ललित पाटील(Lalit Patil) हा उपचाराच्या नावावर रुग्णालयात बसून तो अमली पदार्थांची विक्री करत असल्याचे समोर आल्यानंतर पोलिसांसह प्रशासनाचेही धाबे दणाणले होते. तसेच या प्रकरणात ससूनचे अधिष्ठाता तथा डीन संजीव ठाकूरांवरदेखील गंभीर आरोप करण्यात आले होते.

(Edited By Deepak Kulkarni)

Sasoon Hospital News
Maratha Reservation : द्वेषातून गुन्हे; माजलगावच्या पोलिस निरीक्षकांवर मनमानीचा आरोप, जरांगेंसमोर कैफियत

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com