पिंपरी : भाजपची जंबो राज्य कार्यकारिणी ५ मे रोजी जाहीर झाल्यानंतर राज्यातील जिल्हाध्यक्ष १५ मे व नंतर २० मे पर्यंत जाहीर होतील, असे सांगण्यात आले होते. पण, भाजपचे अध्यक्ष जे.पी.नड्डा यांचा महाराष्ट्र दौरा आणि त्यासाठी तयारीच्या बैठकांचे सत्र यामुळे जिल्हाध्यक्षांच्या नियुक्त्यांची डेडलाईन हुकली आहे.
आता पुढील महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष जाहीर होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. पिंपरी-चिंचवड महापालिकेची आगामी निवडणूक विचारात घेऊन ही निवड केली जाणार आहे.
हा क्रायटेरिया लक्षात घेता विद्यमान शहराध्यक्ष आणि भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनाच ही निवडणूक पार पडेपर्यंत कायम ठेवले जाण्याची शक्यता आहे. तसा सूरही शहर पक्षात दिसून आला आहे.
दुसरीकडे आमदार लांडगे यांचे नाव बहूधा याच महिन्याच्या शेवटी होणाऱ्या राज्य मंत्रीमंडळाच्या विस्तारातही घेतले जात आहे. त्यातून उद्योगनगरीला पहिल्यांदाच मंत्रीपद मिळणार आहे. ते आमदार लांडगेंना मिळाले, तर त्यांना डबल लॉटरी लागणार आहे.
जिल्हाध्यक्ष निवडीपूर्वी त्या-त्या जिल्ह्यात पक्ष निरीक्षक जाऊन तेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी अध्यक्ष निवडीबाबत चर्चा करतील, असे भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रदेश कार्यकारिणी जाहीर झाल्यानंतर सांगितले होते.
त्यानुसार भाजपेच पिंपरी-चिंचवड निरीक्षक आणि प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील यांनी नुकताच पिंपरी-चिंचवडचा दौरा केला. त्यात त्यांनी पक्षाचे शहर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांच्या शहराध्यक्ष निवडीबाबतच्या भावना जाणून घेतल्या.
हा आढावा अहवाल प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना सादर करणार असल्याचे त्यांनी आज 'सरकारनामा'ला सांगितले. बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे मिळून पिंपरी-चिंचवडच्या शहराध्यक्षांची निवड करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
Edited By- Ganesh Thombare
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.