Ekanth Shinde  sarkarnama
पुणे

Shinde alliance statement : शिंदेंची तडजोडीची भूमिका? 'स्थानिक'मधील युतीबाबत केला मोठा खुलासा, म्हणाले, 'किती जागा मिळतात हे महत्त्वाचे नाही'

Maharashtra politics News : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना राज्यभरामध्ये भाजपसोबत युती करण्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. वेळप्रसंगी जागांबाबत तडजोड करण्याची देखील भूमिका शिवसेनेची असल्याचे समोर आले आहे.

Sudesh Mitkar

Pune News : आगामी काळात होत असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये महायुती होणार का? नाही याबाबत अद्याप स्पष्ट झालेली नाही. एकीकडे भाजप नेतृत्वाकडून सातत्याने वेगवेगळ्या ठिकाणी स्वबळाचा नारा देण्यात येत आहे. त्यासोबतच बहुतांश ठिकाणी मैत्रीपूर्ण लढती होणार असल्याचे देखील सांगण्यात येत आहे, असे असले तरी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेतून मात्र महायुतीबाबतची अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आलेली नाही.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची शिवसेना (Shivsena) राज्यभरामध्ये भाजपसोबत युती करण्यासाठी आग्रही असल्याचे सांगितले जात आहे. वेळप्रसंगी जागांबाबत तडजोड करण्याची देखील भूमिका शिवसेनेची असल्याचे समोर आले आहे. या पार्श्वभूमीवर एकनाथ शिंदे यांनी देखील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत महायुती बाबतची आपली भूमिका स्पष्ट केली असून काही ठिकाणी तडजोड करण्यास तयार असल्याचे अप्रत्यक्षरीत्या सांगितले आहे.

पुण्यामध्ये माध्यमांशी बोलताना शिंदे यांना आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये महायुतीचे चित्र कसे असेल असे विचारले असता एकनाथ शिंदे म्हणाले, 'लोकसभा निवडणुकीमध्ये आम्ही महायुतीमध्ये लढलो तसेच विधानसभा निवडणुकीमध्ये महायुती म्हणून लँड्स स्लाईड व्हिक्टरी आम्ही मिळवली. आता स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील महायुतीचा भगवा फडकणार आहे.'

महापालिका निवडणुका अद्याप जाहीर झालेल्या नाहीत. सध्या नगरपालिकेच्या निवडणूक कार्यक्रम सुरू आहे. त्यानंतर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होतील आणि मग महापालिकेच्या निवडणुका जाहीर करण्यात येतील. या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्हाला किती जागा मिळतात, यापेक्षा विचारधारेला आमच्या लेखी जास्त महत्त्व असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

आमचा अजेंडा हा विकासाचा आहे. आमचा अजेंडा खुर्चीचा नाही. त्यासोबतच जागांचा अजेंडा देखील आमचा नाही. महाराष्ट्रातील जनतेला आणि महाराष्ट्राला विकासाच्या दिशेने नेण्यासाठी आणि महाराष्ट्रातील जनतेच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणे, हा आमचा अजेंडा आहे, असे शिंदे म्हणाले.

एकीकडे भाजप राज्यभरामध्ये स्वबळाचा नारा देत जागांवर तडजोड करणार असल्याबाबतची भूमिका घेत असताना दुसरीकडे एकनाथ शिंदे मात्र तडजोडीच्या भूमिकेत असल्याचे पाहायला मिळत आहे. हीच भूमिका एकनाथ शिंदे (Eknath shinde) हे ठाण्यामध्ये घेणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT