BJP Politics : सिन्नरमध्ये पुन्हा राजकीय घरफोडी, खासदार राजाभाऊ वाजेंचे काका भाजपच्या गळाला?

Sinnar politics Rajabhau Waje : भाजपने सिन्नर तालुक्यावर विशेष फोकस केल्याचे दिसते. सुरुवातीला माणिकराव कोकाटेंचे बंधू भारत कोकाटे यांना पक्षात घेतलं. आता भाजपने खासदार वाजेंना धक्का देण्याची तयारी केली आहे.
Rajabhau Waje, Hemant Waje
Rajabhau Waje, Hemant WajeSarkarnama
Published on
Updated on

BJP Expansion in Nashik district: आगामी स्थानिक स्वराज्य संस्थाच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपने सिन्नर तालुक्यावर विशेष लक्ष्य केंद्रित केल्याचे दिसते. राष्ट्रवादी कॉंगेस अजित पवार पक्षाचे मंत्री माणिकराव कोकाटेंना सुरुवातीला भाजपने धक्का दिला. त्यांचे बंधू भारत कोकाटे यांना भाजपने गळाला लावत पक्षात प्रवेश दिला. त्यानंतर आता भाजप शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार राजाभाऊ वाजे यांना धक्का देण्याच्या तयारीत आहे.

खासदार राजाभाऊ वाजे यांचे काका, माजी नगराध्यक्ष हेमंत वाजे हे भाजपच्या वाटेवर असल्याचे बोलले जात आहे. येत्या दोन दिवसांत मुंबईत मुख्यमंत्री फडणवीसांच्या उपस्थितीत त्यांचा पक्षप्रवेश होणार असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. नगराध्यक्ष पदासाठी ते इच्छुक असून त्यांना भाजपकडून एबी फॉर्मही दिला जाणार असल्याचे समजते.

खासदार राजाभाऊ वाजे यांनी दोन दिवस इच्छुकांच्या बैठका घेतल्या. मात्र या दोन्ही बैठकांकडे हेमंत वाजे यांनी पाठ फिरवल्याने त्यांच्या भाजप प्रवेशाच्या वृत्ताला दुजोरा मिळाला. खरेतर हेमंत वाजे नगराध्यपदासाठी शिवसेनेकडूनच इच्छुक होते. मात्र पक्षाच्या सर्वेनंतर उमेदवार ठरणार आहे. सर्वेत त्यांचे नाव दोन नंबरला असल्याने शिवसेनेकडून उमेदवारी मिळण्याची शक्यता कमी आहे. हेच लक्षात घेऊन भाजपने त्यांना गोंजरल्याचे समजते.

दरम्यान जोपर्यंत राजाभाऊ वाजे यांच्याकडून नकार येत नाही तोपर्यंत कुठलाही निर्णय घेण्याची घाई हेमंत वाजे यांनी केली नाही. दोन-तीन दिवसांपूर्वीच त्यांची राजाभाऊ सोबत चर्चा झाली. त्यावेळी सर्वेत त्यांचे नाव दोन नंबरला आहे व त्यामुळे उमेदवारीची शक्यता कमी आहे हे कळाल्यानंतर हेमंत वाजे यांनी पुढील हाचलाची केल्याचे सांगितले जाते.

Rajabhau Waje, Hemant Waje
Nashik ZP : अजित पवारांच्या राष्ट्रवादीला शह देण्यासाठी भाजपची 'व्यूह' रचना, पुढचं जाळं कोणत्या तालुक्यात?

भाजपही सिन्ररमध्ये नगराध्यक्षपदासाठी तगड्या उमेदवाराच्या शोधात होतं. त्यामुळे हेमंत वाजे यांच्यासारखा उमेदवार मिळत असल्याने नामदेव लोंढे यांना भाजपकडून थांबवल्याचे समजते. प्राथमिक स्तरावर भाजप प्रदेशाध्यक्ष व मुख्यमंत्र्यांशी फोनवर चर्चा झाली असून भाजपने हेमंत वाजे यांच्या सर्व अटी-शर्ती मान्य केल्याचे समजते.

Rajabhau Waje, Hemant Waje
Sinnar Politics : सिन्नरमध्ये काका विरुद्ध पुतणी सामना टाळण्यासाठी प्रयत्न, कुणाचा पुढाकार?

खासदार राजाभाऊ वाजे व काका हेमंत वाजे यांच्यात तसे काही मतभेत नाही. राजाभाऊ वाजे यांनी नेहमी काका हेमंत वाजे यांना विश्वासात घेऊनच राजकीय निर्णय घेतले आहेत. मात्र तरीही हेमंत वाजे हे भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सुरु झाल्याने सिन्नर तालुक्याच्या राजकारणात चर्चांना उधाण आलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com