Vijay Shivtare, Eknath Shinde, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

Eknath Shinde and Vijay Shivtare : एकनाथ शिंदे पाठवणार शिवतारेंना नोटीस, भूमिकेवर ठाम राहिल्यास पक्षातून हकालपट्टी?

Shivsena and NCP News : शिवतारेंविरोधात आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांकडून आक्रमक भूमिका अन् शिवसेनेला सूचक इशारा

Sudesh Mitkar

Loksabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बारामती लोकसभा मतदारसंघामध्ये हाय व्होल्टेज ड्रामा पाहायला मिळत आहे. बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात सुनेत्रा पवार अशी दुरंगी लढत होणार असं वाटत असतानाच शिवसेना नेते विजय शिवतारे यांनीदेखील शड्डू ठोकला आहे. त्यामुळे ही लढत आता तिरंगी होणार आहे.

शिवतारे यांनी अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतल्यानंतर सातत्याने त्यांनी अजित पवारांविरोधात वक्तव्यं केली आहेत. तसेच पक्षविरोधी भूमिका मांडली आहे. यामुळे त्यांच्या विरोधात शिस्तभंगाची कारवाई करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे.

बारामती लोकसभा निवडणुकीमध्ये विजय शिवतारे यांनी उडी घेतल्याने बारामतीच्या राजकारणाचे संपूर्ण चित्र पालटले आहे. त्यांनी घेतलेल्या या निर्णयामुळे अजित पवार आणि त्या अनुषंगाने महायुतीच्या अडचणी वाढणार आहेत. त्यामुळे शिवसेनेकडून शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई होण्याची शक्यता आहे. स्वतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी(Eknath Shinde) असे आदेश दिल्याची माहिती समोर येत आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

बारामतीत अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांना उमेदवारी देण्याचा निर्णय महायुतीनं एकमतानं घेतला आहे. शिवसेनेनं महायुतीतला घटक पक्ष असल्याने सुनेत्रा पवार यांच्या उमेदवारीला पाठिंबा दिला. या परिस्थितीत विजय शिवतारे(Vijay Shivtare) जर अपक्ष म्हणून निवडणूक रिंगणात उतरणार असतील, तर तो सरळ सरळ शिस्तभंग ठरतो. त्यामुळेच शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई करण्याच्या सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिल्या असल्याचे सांगण्यात येत आहे.

मुख्यमंत्र्यांसह इतर मंत्र्यांनी समजावूनदेखील शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम असल्याने पक्षाकडून आता शिवतारेंवर शिस्तभंगाची कारवाई का करू नये, अशी नोटीस पाठवली जाणार आहे. या नोटिशीनंतर तरी शिवतारे युतीधर्म पाळतात का ? की आपल्या भूमिकेवर ठाम राहत नोटिशीला काय उत्तर देतात, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मात्र, शिवतारे आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्यास पक्षातून त्यांची हकालपट्टी केली जाईल, अशी माहिती शिवसेनेच्या एका बड्या नेत्याने दिली आहे.

शिवतारेंविरोधात राष्ट्रवादी आक्रमक -

अजित पवारांविरोधात विजय शिवतारे यांनी आक्रमक पवित्रा घेतल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसने ही जशास तसे उत्तर देण्यास सुरुवात केली आहे. विजय शिवतारे यांनी बंडखोरी केली तर राज्यभर त्याचे परिणाम उमटतील. शिंदे गटाच्या एकाही उमेदवाराचा प्रचार अजित पवारांची(Ajit Pawar) राष्ट्रवादी करणार नाही, अशी भूमिका राष्ट्रवादीच्या नेत्यांनी घेतली आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT