महायुतीत जागावाटपाबाबत अंतिम निर्णय झाला नाही. त्यामुळे महायुतीत कोणता फॉर्म्युला समोर येणार, याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. यातच राष्ट्रवादी काँग्रेसच्या ( Ncp ) बैठकीत लोकसभेच्या सात जागांवर चर्चा करण्यात आली आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या वाट्याला सात जागा येणार असल्याचं सांगितलं जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादीची पुण्यातील 'बोट क्लब' येथे बैठक पार पडली. राज्यातून आमदार, खासदार आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांनी आमदार, खासदार आणि पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं.
या बैठकीत बारामती, शिरूर, सातारा, धाराशिव, नाशिक, रायगड, परभणी लोकसभा मतदारसंघांबाबत चर्चा झाली. परभणी लोकसभा मतदारसंघातील उमेदवार दोन दिवसांत ठरवण्याचा निर्णय घेतला आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर ( Mahadev Jankar ) यांच्या उमेदवारीबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. बारामतीचा उमेदवार बदलणार नाही, म्हणत सुनेत्रा पवार ( Sunetra Pawar ) यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब झाल्याचं बोललं जात आहे. विजय शिवतारे यांच्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे निर्णय घेतील, अशीदेखील चर्चा करण्यात आली.
स्थानिक आमदारांवर लोकसभा मतदारसंघाची जबाबदारी देण्यात आली आहे. प्रत्येक आमदाराबरोबर पाच ते सहा सदस्यांची टीम असणार आहे. ही टीम प्रचार नियोजन, महायुतीच्या उमेदवारांबरोबर समन्वय साधण्याचे काम करणार आहे. निवडणूक पाच टप्प्यांत होणार असून, वेळेचा सदुपयोग करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. 28 तारखेला जागावाटपाबाबत निर्णय होईल, असंही बैठकीत सांगण्यात आलं.
( Edited By : Akshay Sabale )
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.