Pune Police News: पुणे शहरात आगामी बकरी ईद तसेच इतर सण-उत्सवांच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनाने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. शहरात मंगळवार (ता. 26) रात्रीपासून पुढील १४ दिवसांसाठी प्रतिबंधात्मक आदेश लागू करण्यात आले असून, या काळात कोणत्याही प्रकारचे मोर्चे, आंदोलने, सभा आणि मिरवणुका घेण्यास मनाई करण्यात आली आहे.
पुणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत महाराष्ट्र पोलीस अधिनियम १९५१ अंतर्गत कलम ३७ (१), (२) आणि (३) नुसार हे आदेश लागू करण्यात आले आहेत. सार्वजनिक शांतता बिघडू नये आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी ही खबरदारी घेतल्याचे प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
या आदेशानुसार पाच किंवा त्यापेक्षा अधिक व्यक्तींना विनापरवानगी एकत्र येण्यास बंदी असेल. तसेच लाठ्या, तलवारी, दगड, स्फोटके किंवा इतर धोकादायक वस्तू बाळगण्यासही मनाई करण्यात आली आहे. भडकाऊ घोषणा, भाषणे, गाणी किंवा सार्वजनिक शांतता भंग होईल अशा कृतींवरही बंदी घालण्यात आली आहे.
दरम्यान, पेट्रोल-डिझेल दरवाढीविरोधात विविध राजकीय आणि सामाजिक संघटनांकडून आंदोलनाची तयारी सुरू असल्याची चर्चा शहरात रंगली आहे. त्यामुळेच प्रशासनाने हा निर्णय घेतल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. मात्र पोलिसांकडून अधिकृतरित्या हा आदेश सण-उत्सव आणि कायदा सुव्यवस्था लक्षात घेऊन जारी करण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे.
प्रतिबंधात्मक आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरोधात कठोर कारवाई करण्यात येणार असून, संशयास्पद वस्तू किंवा शस्त्रे आढळल्यास पोलिसांना ती जप्त करण्याचे अधिकार असतील. आवश्यकता भासल्यास संबंधित व्यक्तींवर गुन्हेही दाखल केले जाऊ शकतात.
पुणे शहरात पुढील काही दिवस विविध धार्मिक कार्यक्रम आणि आंदोलने होण्याची शक्यता लक्षात घेता पोलीस प्रशासन सतर्क झाले असून, नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
शस्त्रे, सोटे, भाले, तलवारी, दंड, काठ्या, बंदुका व शारीरिक इजा करण्यासाठी वापरात येईल अशी कोणतीही वस्तू बरोबर नेणे.
कोणताही दाहक पदार्थ अथवा स्फोटक पदार्थ, ज्वलनशील द्रव पदार्थ बरोबर नेणे.
दगड अथवा शस्त्रे किंवा अस्त्रे, सोडावयाची अस्त्रे किंवा फेकावयाची हत्यारे अगर साधने बरोबर नेणे, जमा करणे व तयार करणे.
कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे, पुढा-यांच्या चित्राचे, प्रतिमेचे प्रदर्शन व दहन करणे.
मोठयाने अर्वाच्च घोषणा देणे, सार्वजनीक टिका करणे, उच्चार गाणी गाणे, वाद्य वाजविणे.
शिष्टाचाराच्या विरोधात असणारे चित्रे, चिन्हे, फलक किंवा इतर कोणतीही वस्तु वापरणे किंवा वस्तु तयार करणे, प्रदर्शन करणे किंवा प्रसारित करणे जेणे करुन सार्वजनिक नैतिकता किंवा सुरक्षा धोक्यात येईल किंवा राज्य उलथून टाकण्यास कारणीभूत ठरू शकेल.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.