SSC Board Exam Big Change: दहावीच्या परीक्षेत मोठा बदल; परीक्षा केंद्रांना प्रश्नपत्रिका 2 तास आधी ऑनलाइन मिळणार

Maharashtra State Board introduces a major change in SSC exams:दहावीच्या परीक्षांमध्ये राज्य मंडळाचा मोठा बदल केला आहे. परीक्षा केंद्रांना प्रश्नपत्रिका आता परीक्षा सुरू होण्याच्या 2 तास आधी ऑनलाइन पाठवण्यात येणार आहेत.
SSC Board Exam Big Change
SSC Board Exam Big ChangeSarkarnama
Published on
Updated on

SSC Exam New Rules: नीट आणि अन्य परीक्षा पेपरफुटीच्या घटनांनंतर आता राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या परीक्षांसाठी मोठा निर्णय घेतला आहे. पुढील काळात दहावीच्या प्रश्नपत्रिका थेट परीक्षा केंद्रांना ऑनलाइन पद्धतीने पाठवण्यात येणार आहेत.

सुरुवातीला पुण्यातील २४ परीक्षा केंद्रांवर एका विषयासाठी हा पायलट प्रोजेक्ट राबवला जाणार आहे. हा प्रयोग यशस्वी ठरल्यास राज्यातील सर्व विभागीय मंडळांमध्ये ही पद्धत लागू केली जाईल, असे राज्य परीक्षा मंडळाने स्पष्ट केले आहे. येत्या जून महिन्यात होणाऱ्या दहावीच्या पुरवणी परीक्षेपासून पथदर्शी प्रकल्प म्हणून या निर्णयाची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.

या नव्या व्यवस्थेनुसार परीक्षा सुरू होण्याच्या केवळ दोन तास आधी प्रश्नपत्रिकेची लिंक ओपन होणार आहे. संबंधित परीक्षा केंद्राच्या मुख्य संगणकावर सुरक्षित कोडद्वारे प्रश्नपत्रिका उपलब्ध होईल. त्यानंतर केंद्रावरच हाय-स्पीड प्रिंटरच्या मदतीने प्रश्नपत्रिका छापून विद्यार्थ्यांना वितरित केल्या जाणार आहेत.

SSC Board Exam Big Change
MPSC Typing Test Cancelled: MPSC विद्यार्थ्यांना मोठा दिलासा! आता टायपिंग टेस्ट नाही

पेपरफुटी रोखण्याचा प्रयत्न

मागील काही वर्षांत दहावी-बारावीच्या प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या होत्या. त्यामुळे पेपरफुटी थांबवण्यासाठी आणि परीक्षा अधिक पारदर्शक करण्यासाठी हा डिजिटल प्रयोग राबवण्यात येत आहे.

SSC Board Exam Big Change
Anganwadi Workers News: अंगणवाडी सेविकांना मोठा दिलासा! 45 वर्षांवरील महिलांनाही मिळणार पदोन्नती

विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय

या प्रणालीमुळे प्रश्नपत्रिका लीक होण्याचा धोका कमी होईल, असा दावा मंडळाकडून करण्यात आला आहे. तसेच प्रश्नपत्रिकांच्या वाहतुकीवरील खर्चातही बचत होणार आहे.

गडचिरोलीतही प्रयोगाची तयारी

जून महिन्यात होणाऱ्या पुरवणी परीक्षांपासून या नव्या प्रणालीची अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न सुरू आहे. गडचिरोलीमध्येही ही पद्धत लागू करण्याबाबत हालचाली सुरू असल्याची माहिती समोर आली आहे.

हा प्रयोग पूर्णपणे यशस्वी झाल्यास भविष्यात दहावी आणि बारावीच्या मुख्य परीक्षांमध्येही ऑनलाइन प्रश्नपत्रिका प्रणाली लागू केली जाऊ शकते, असे राज्य परीक्षा मंडळाचे अध्यक्ष त्रिगुण कुलकर्णा यांनी सांगितले.

कशी असेल नवी डिजिटल प्रणाली?

  • प्रश्नपत्रिका थेट परीक्षा केंद्रावर ऑनलाइन पोहोचवली जाईल.

  • परीक्षा सुरू होण्याच्या दोन तास आधीच डाउनलोडची परवानगी मिळेल.

  • प्रत्येक केंद्राला सुरक्षित पासवर्ड आणि डिजिटल लॉकिंग सिस्टम दिली जाईल.

  • प्रश्नपत्रिका डाउनलोड झाल्यानंतर लगेचच केंद्रावर प्रिंट काढली जाईल.

  • वाहतूक किंवा ट्रेझरीमधून पेपर पाठवण्याची जुनी पद्धत बंद होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com