Raj Thackeray Sarkarnama
पुणे

Raj Thackeray News : पावसानंतरही राज ठाकरेंनी सभा गाजवली; तडाखेबंद भाषणातील '११' मुद्दे

Sachin Waghmare

Pune News : देशात लोकसभेच्या १९५२ सालापासून आतापर्यंतच्या काळात देशात ज्या निवडणूक झाल्या त्या प्रत्येक निवडणुकीला विषय होता. काही तरी मुद्दा होता. मात्र ही पहिलीच निवडणूक असले की या निवडणुकीत कोणताच मुद्दा नाही. आता काहीच मुद्दा नसल्यामुळे प्रत्येकजण काहीही मुद्दा काढत आहेत. महाराष्ट्र असा नव्हता. या सर्व गोष्टी बाहेरच्या राज्यात चालू शकतात. असा महाराष्ट्र कधीच नव्हता. महाराष्ट्रातील काही पुढाऱ्यांनी वेगळ्याच विषयात तुम्हाला गुंतवून ठेवलं आहे”, अशी जोरदार टीका राज ठाकरे यांनी केली.

पुण्यातील महायुतीचे (Mahayuti) उमेदवार मुरलीधर मोहोळ (Murlidhar Mohol) यांच्या प्रचारार्थ मनसेचे प्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांची सभा पार पडली. यावेळी ते बोलत होते. यावेळी त्यांनी पुणे शहरातील विविध विकासात्मक मुद्द्यांवर भाष्य केले. त्यांच्या भाषणातील मुद्दे पुढील प्रमाणे. (Raj Thackeray News )

- पुण्यासारख्या मोठ्या शहरात, ज्या शहराने इतके विद्वान दिले, अशा एका पुणे शहरात तुम्हाला एका पुन्हा सत्तेत बसणाऱ्या खासदाराची उमेदवारी मिळाली आहे म्हणून मी आलेलो आहे.

-आपल्याकडची मुलं परदेशी का जात आहेत? ते एकाच गोष्टीसाठी जात आहेत. ते म्हणजे सभोतालचं वातावरण. त्यांच्या सभोतालचं वातावरण त्यांना आनंदी ठेवत नाही.

-आपले खासदार-आमदार असतील, सर्वात पहिली जबाबदारी हे सभोवतालचं वातावरण तयार करणं असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

-आपल्याकडे राजकीय मुद्दे काढले जातात ते खालपर्यंत जातात. ते वातावरण त्यांना आवडत नाही. अशा घाणेरड्या वातावरणात त्यांना राहायची इच्छा नाही.

-आपण विमानतळ आणि ट्रेनमध्ये सोडायला जातो तेव्हा बाहेरचं काही खाऊ नको, असे सल्ले देतो. आपल्या नियोजनशून्य गोष्टींमुळे शहरं डोळ्यांदेखत बरबाद होत आहेत.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

-नियोजन शून्यतेमुळे पुणे शहर बरबाद होतेय. मुंबईची वाट लागायला खूप काळ लागला नाही.

- दुसऱ्या गोष्टीत गुंतवून ठेवण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यामुळे विरोधकांकडे कसलाच मुद्दा शिल्लक राहिला नसल्याचे जाणवत आहे.

- शहर बरबाद झाले तरी आम्ही थंड असतो. शहराच्या विकासाकडे व समस्याकडे लक्ष देण्याची गरज आहे.

- अजित पवार यांनी कधीच जातीपातीचे राजकारण केले नाही. पुण्यात जेम्स लेन प्रकरणी समाजात विष कालविण्यात आले.

- अयोध्येत राम मंदिर नरेंद्र मोदीमुळेच झाले. त्यामुळे मंदिराचे संपूर्ण श्रेय हे कारसेवकांना दिले पाहिजे.

-मुस्लिम समाजाकडून मतदान कारण्याबाबत फतवे काढली जात आहेत.

SCROLL FOR NEXT