Ajit Pawar News : ...पण अजितदादा आजही उद्धव ठाकरेंच्याच पाठीशी ?

Loksabha Election 2024 : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्रचारसभांचा महाराष्ट्रात धडाका सुरू आहे. या सभांमध्ये ते उद्धव ठाकरे, शरद पवारांवर टीकेची झोड उठवत आहे.
Uddhav Thackeray-Ajit Pawar
Uddhav Thackeray-Ajit PawarSarkarnama

Pune News : उपमुख्यमंत्री अजित पवार हे त्यांच्या बेधडक वक्तव्यांसाठी ओळखले जातात. ते कौतुक करताना हातचं राखून करत नाही आणि टीका करताना कुणाचाही मुलाहिजा बाळगत नाही.त्यांच्या या स्वभावाचा अनुभव स्वपक्षीयांसह विरोधकांनाही अनेकदा येत असतो. आता ते महायुती सरकारमध्ये सहभागी झाल्यानंतरही आजही महाविकास आघाडी सरकारमधील आपले जुने सहकारी आणि माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे असल्याचे दिसून येत आहे. (Ajit Pawar Latest News)

शिवसेनेतील बंडानंतर विधानसभेचे तत्कालीन विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी एकनाथ शिंदे यांचे कान टोचतानाच शिवसेनेतील बंडखोर आमदारांनाही अनेकदा फटकारले होते. तसेच बाळासाहेब ठाकरेंनी (Balasaheb Thackeray) उभ्या केलेल्या शिवसेनेवरती उद्धव यांचाच अधिकार असल्याचे अगदी ठणकावून सांगितले होते. पत्रकार परिषदा, सभांमधील भाषणांमधून ठाकरेंची कायमच पाठराखण केली होती.

Uddhav Thackeray-Ajit Pawar
Loksabha Election 2024 : तुम्ही बूथ मजबूत करा, मी जिल्हा मजबूत करते : पंकजा मुंडे

पण एकेकाळी शिवसेनेतील फाटाफुटीवरुन शिंदेंवर हल्लाबोल करणार्या अजितदादांनीच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात बंडाचं निशाण फडकवलं.एवढंचल नव्हे तर शिंदेंच्या पावलावर पाऊल टाकत 40 आमदारांना आपल्यासोबत आणत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि घड्याळ चिन्हही पदरात पाडून घेतलं.पण आता यानंतरही अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे सत्तेत गुण्यागोंविदाने नांदत आहेत.

उपमुख्यमंत्री अजित पवारांनी केलेल्या एका विधानामुळे महायुतीत खळबळ उडण्याची शक्यता आहे. या त्यांच्या विधानानंतर ते आजही शिवसेनेतील बंडखोरीनंतर उद्धव ठाकरेंच्याच (Uddhav Thackeray) बाजूने आहेत की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्या प्रचारसभांचा महाराष्ट्रात धडाका सुरू आहे. या सभांमध्ये ते उद्धव ठाकरे, शरद पवारांवर टीकेची झोड उठवत आहे.त्यातच त्यांनी उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेचा थेट 'नकली सेना'असा उल्लेख केला आहे. तसेच शरद पवारांच्या गटाला नकली राष्ट्रवादी असा टोलाही लगावला आहे.मोदींची ही टीका ठाकरेंच्या चांगलीच जिव्हारी लागली आहे.त्यांनी मोदींचा बेकली असा उल्लेख करत जशास तसं पलटवारही केला आहे.

अशातच आता अजित पवार (Ajit Pawar) हे उद्धव ठाकरे यांच्या मदतीसाठी धावून आल्याचे पाहायला मिळत आहे.त्यांनी मोदी यांचं ठाकरे यांच्या शिवसेनेबाबत केलेलं विधान हे राजकीय हेतूने केले असल्याचं म्हटलं आहे.ते म्हणाले, मोदी यांचं नकली शिवसेना हे पॉलिटिकल स्टेटमेंट आहे. ते कुठल्या हेतूने बोलले माहीत नाही.त्यांच्या विधानावर मी प्रतिक्रिया देणं उचित नाही.सध्या तरी नकली शिवसेना या मोदींच्या टीकेवर बोलणार नाही असं अजित पवार यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

(Edited By Deepak Kulkarni)

Uddhav Thackeray-Ajit Pawar
Raksha Khadse : रक्षा खडसेंचं मोठं पाऊल; रावेर पुन्हा काबीज करण्यासाठी कट्टर विरोधकाच्या घरी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com