Amit Thackeray, Vasant More Sarkarnama
पुणे

Vasant More Resign MNS : 'ती' फेसबुक पोस्ट ठरली वसंत मोरे यांच्या राजीनाम्याला कारणीभूत?

Conflict within the party : पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे राजीनामा दिला असल्याचे स्पष्ट केले आहे. मात्र, याव्यतिरिक्त अजून एक कारण असल्याचं बोललं जात आहे.

Sudesh Mitkar

Pune News : मनसेला वसंत मोरे यांनी राम राम ठोकल्यानंतर त्यांच्या राजीनाम्याची अनेक कारणे समोर आली आहेत. त्यातील बहुतांश कारणे ही वसंत मोरे यांनी सांगितली असून, पक्षांतर्गत कुरघोड्यांमुळे आपण राजीनामा दिला असल्याचे मोरे यांनी स्पष्ट केले आहे. मात्र, याव्यतिरिक्त अजून एक कारण मोरे यांच्या राजीनाम्याला कारणीभूत ठरलं असल्याचं बोललं जात आहे.

काही दिवसांपूर्वी मनसे (MNS) कडून विद्यार्थ्यांच्या विविध मागण्यांसाठी पुणे विद्यापीठावरती विराट मोर्चा काढला होता. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला होता. या मोर्चाची जितकी चर्चा झाली तितकीच चर्चा त्या मोर्चाच्या दुसऱ्या दिवशी वसंत मोरे यांनी केलेल्या पोस्टचीदेखील झाली. वसंत मोरे यांनी अमित ठाकरे (Amit Thackeray) यांचा एक व्हिडिओ शेअर करत मोर्चामध्ये मीदेखील उपस्थित होतो हे दाखवण्याचा प्रयत्न केला होता. तसेच या व्हिडिओखाली मोरे यांनी आपले म्हणणे मांडले होते.

काय होती पोस्ट

"महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते मा. अमित राजसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पुणे विद्यापीठावर यशस्वी असा मोर्चा झाला आणि संध्याकाळी मा. अमितसाहेबांचा मला फोन आला होता ते म्हणाले, आजचा मोर्चा खूप छान झाला. मला समजले तुम्हीही खूप कार्यकर्ते घेऊन आला होता..., पण मला तुम्ही दिसला कसे नाहीत, भेटला कसे नाहीत...

मी साहेबांना बोललो साहेब मी तुमच्या अवतीभवती होतो, त्याचा हा पुरावा...

साहेब मी काम करणारा आहे, नुसता मिरवणारा नाही... त्यामुळे कदाचित गर्दीत तुम्हाला मी दिसलो नसेल... मी तुमच्या मागे अगदी दोनच पावले चालत होतो, असो मी कायमच तुमच्या पाठीमागे असेल...

अमितसाहेब तुमच्यासाठी काही, पण फक्त मला समजून घ्या..." असे या पोस्टमध्ये म्हटले होते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

या पोस्टनंतर अमित ठाकरे यांनी वसंत मोरे यांना फोन करून याबाबत विचारणा केली होती. तसेच खुलासादेखील मागवला होता, असं बोललं जात आहे. यावर आता खुद्द वसंत मोरे यांनीच खुलासा केला आहे. ते म्हणाले, त्या पोस्टबाबत विचारणा करण्यासाठी अमित ठाकरे यांचा फोन आला होता. मला आजपर्यंत राज ठाकरे कधी काही बोलले नाहीत. मात्र, अमित ठाकरे हे मला म्हणाले, तुम्ही सोशल मीडियावरती खूप ॲक्टिव्ह असता. सोशल मीडियावरती पोस्ट टाकताना ती कशाला टाकता? का टाकता हे बघा नाहीतर तुमचं नशीब तुमच्याकडे, असं अमित ठाकरे बोलले असल्याचा खुलासा मोरे यांनी केला आहे.

या संवादामुळे वसंत मोरे कुठेतरी नाराज होते आणि हीच नाराजी त्यांच्या राजीनाम्यामध्ये परावर्तित झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. असे असले तरी मोरे यांनी याबाबत मात्र स्पष्टता दिलेली नाही.

(Edited by Amol Sutar)

R

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT