Rahul Gandhi News : प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दरवर्षी जमा होणार एक लाख रुपये!

Dhule Congress धुळे येथील महिला मेळाव्यात काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी दिलेल्या पाच गॅरंटी ठरणार काँग्रेससाठी टर्निंग पॉइंट!
Rahul Gandhi In Dhule
Rahul Gandhi In Dhulesarkarnama
Published on
Updated on

Bharat Jodo Yatra Politics : राहुल गांधी यांनी आज धुळे येथे महिला मेळाव्याला संबोधित केले. या वेळी त्यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षासाठी टर्निंग पॉइंट ठरतील, अशा पाच गॅरंटी सांगितल्या. धुळे येथे केलेल्या या घोषणा राजकीयदृष्ट्या चर्चेचा विषय ठरू शकतील.

काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली दुसऱ्या टप्प्यातील भारत जोडाे न्याय यात्रा आज धुळे शहरात दाखल झाली. या वेळी त्यांचा 'रोड शो' झाला. त्यांनी कार्यकर्ते पदाधिकारी आणि नागरिकांशी थेट संवाद केला. प्रत्येक युवकाला युवतीला ते प्रश्न विचारून संवाद साधत होते. त्यांच्या या संवादाला उपस्थितांकडूनही तेवढ्याच उत्स्फूर्त आणि मोठा प्रतिसाद मिळत होता. या संवादामुळे युवकांमध्ये राहुल गांधी यांची भारत जोडो यात्रा चर्चेचा विषय ठरली.

धुळे शहरात झालेल्या महिला मेळाव्याला मोठी गर्दी होती. या वेळी राहुल गांधी (Rahul Gandhi) यांनी केंद्र शासनाने महिला आणि गरीब नागरिकांची कशी कोंडी केली आहे हे मांडले. काँग्रेस पक्ष आज देशात भारतीय जनता पक्षाच्या धोरणामुळे निर्माण झालेले प्रश्न सोडविण्यासाठी सर्वप्रथम प्रयत्न करेल. युवा, महिला आणि गरिबांना न्याय देण्याची पक्षाची हमी असेल. या वेळी त्यांनी महिलांसाठी पाच मोठ्या घोषणा केल्या.

Rahul Gandhi In Dhule
Rahul Gandhi News : राहुल गांधींनी नंदूरबारमध्ये जाऊन विजयकुमार गावित यांचे वाभाडे काढले!

या घोषणा म्हणजे गॅरंटी असून, देशातील प्रत्येक महिलेला सक्षम करण्याचा पक्षाचा प्रयत्न असेल. आपले सरकार येताच या घोषणांची तातडीने कार्यवाही करण्याचे काम केले जाईल. देशातील प्रत्येक महिलेच्या बँक खात्यात दरवर्षी एक लाख रुपये जमा करण्यात येतील. प्रत्येक सरकारी नोकरीत महिलांना 50 टक्के आरक्षण देण्यात येईल. आशा वर्कर्स आणि अंगणवाडी सेविकांच्या मासिक वेतनात वाढ करण्यात येईल.

महिलांसाठी मैत्री कक्ष स्थापन केला जाईल. सावित्रीबाई फुले यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ सर्व सोयींनी युक्त अशी वस्तीगृहे उभारण्यात येतील. अशा पाच गॅरंटी राहुल गांधी यांनी या वेळी दिल्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभा निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाच्या प्रचार मोहिमेत 'मोदी की गॅरंटी' ही टॅगलाइन वापरली आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Rahul Gandhi In Dhule
Bharat Jodo Nyay Yatara in Maharashtra : राहुल गांधींच्या न्याय यात्रेत फडकणार काँग्रेसचा सर्वात मोठा झेंडा...

त्याला उत्तर म्हणून काँग्रेस नेते राहुल गांधी यांनीही महिलांसाठी गॅरंटी दिली आहे. काँग्रेस नेते गांधी यांच्या महिलांसाठीच्या पाच गॅरंटी या महिलांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे या घोषणांचे धुळे येथील मेळाव्यात महिलांनी अतिशय उत्साहात व घोषणा देत स्वागत केले. या घोषणा आगामी निवडणुकीत काँग्रेस पक्षासाठी टर्निंग पॉइंट ठरणार का, याची आता उत्सुकता आहे.

Edited By : Umesh Bambare

R

Rahul Gandhi In Dhule
सभा राहुल गांधींची, गाजवली बाळासाहेब थोरातांनी | Balasaheb Thorat | Rahul Gandhi | Nandurbar |

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com