Nana Patole Sarkarnama
पुणे

Congress News : शेतकऱ्यांवर अत्याचार करण्याचे पाप भाजप सरकार करतंय; नाना पटोलेंचा घणाघात

Farmers Protest Delhi Nana Patole Criticize Modi Government : शेतकरी आंदोलनावरून नाना पटोलेंचा भाजपवर हल्लाबोल...

सरकारनामा ब्यूरो

Congress Shivir Lonavala News :

लोणावळ्यात काँग्रेसचे दोन दिवसांचे शिबिर झाले. या शिबिरानंतर काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी माध्यमांशी संवाद साधत शेतकऱ्यांचे आंदोलन आणि देशातील बेरोजगारीच्या मुद्द्यावरून सत्ताधारी Bjp वर निशाणा साधला. भाजपला जशात तसे वैचारिक उत्तर देणार, असे पटोले म्हणाले.

महाराष्ट्र काँग्रेसच्या दोन दिवसांच्या शिबिरात तीन ठराव मंजूर करण्यात आले. भाजप केंद्र सरकारने शेतकऱ्यांची फसवणूक केली आहे. महाराष्ट्राच्या संतांच्या भूमीत येऊन खोटे बोलेल, स्वामीनाथन आयोग लागू करू असे सागितले. शेतकऱ्यांना खोटे आश्वसन दिले. त्या आधारे मतं घेतली. स्वामीनाथन यांना भरतारत्न पुरस्कार दिला. पण त्याच्या मुलीने खंत व्यक्त केली. आणि भाजपने केंद्राच्या वेबसाइटवरून स्वामीनाथन यांच्या शिफारशीच काढून टाकल्या. शेतकऱ्यांबद्दलचा भाजचा खोटारडापणा यातून स्पष्ट झाला आहे, अशी टीका नाना पटोले यांनी केली.

दुसरीकडे दिल्लीत शेतकऱ्यांवर अत्याचार करण्यात येत आहेत. शेतकऱ्यांवर लाठीमार होतो, छऱ्यांनी फायरींग होत आहे. प्लास्टिकच्या गोळ्या मारल्या जात आहेत. अश्रूधुराच्या नळकांड्या फोडल्या जात आहेत. हे भाजप सरकारचे पाप आहे. यामुळे भाजप सरकारचा निषेध ठरवा आम्ही मंजूर केला आहे, असे त्यांनी सांगितले.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आमचे सरकार आले तर एमएसपी लागू करू, असे राहुल गांधी म्हणालेत. त्यांच्या घोषणेच्या स्वागताचा ठराव आम्ही मंजूर केला. कुस्तीपटूंवर लैगिक अत्याचाराचे आरोप झाले. भाजप खासदारला पक्ष संभाळत बसला. महिलांवर अत्याचार करत राहिले. दुसरीकडे कर्ज लादण्याचा प्रकार सुरू आहेत. कर्ज लादले जात आहेत. मोफत अन्न दिलं जातंय. अर्थ व्यवस्था बिघडवत आहेत. लोकांना गरीब बनवलं जात आहे, याचाही निषेध केला. मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती करू, असा ठराव केल्याचे ते म्हणाले.

'भाजपने भ्रष्टाचार वाढवला'

भाजपने ईडी सीबीआयचा वापर करून भ्रष्टाचार वाढवला आहे. अजित पवार यांनी 70 हजार कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप झाला. हे भ्रष्टाचारी लोक आहे, असे सांगणारे पंतप्रधान त्यांना घेऊन उपमुख्यमंत्री, मंत्री केलं. त्यांना पाठीशी घातलं. व्हाइट पेपर आणून आदर्श घोटाळ्याचा आरोप केला. अशोक चव्हाण यांच्यावर आरोप केला. त्यांनाच भाजपमध्ये घेतलं आणि राज्यसभा खासदार केला, असा टोला पटोलेंनी केला.

जेष्ठ पत्रकार निखिल वागळे, वकील असीम सरोदे यांच्या गाडीवर पुण्यात शाई फेकत भाजपच्या गुंडांनी त्यांना मारहाण केली. त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला. पण अशी अनेक उदाहरणं आपल्याला दिसत आहेत, भाजपने अन्याय केल्याची असा घाणाघात नाना पटोले यांनी केला.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT