Loksabha Election 2024 : मुंबईतील तीन जागांवर काँग्रेसचा दावा; अस्लम शेख लागले तयारीला...

Aslam Shaikh : मुंबईतून अल्पसंख्याक समाजाचे दोन आमदार आहेत. मी आणि अमीन पटेल. आम्हा दोघांपैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी आमची लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी आहे.
Aslam Shaikh
Aslam Shaikhsarkarnama

Maharashtra Politics News : महाआघाडीमधील लोकसभेच्या जागावाटपाचे चित्र अजून स्पष्ट झाले नाही. जागावाटपाबाबत वरिष्ठ नेते चर्चा करत असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मुंबईतील जागांसाठी शिवसेना (ठाकरे गट) आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच आहे. काँग्रेसने मुंबईतील सहा जागांपैकी तीन जागा मागितल्या आहेत. या तीन जागांपैकी एक जागा अल्पसंख्याक समाजाला द्यावी, अशी मागणी काँग्रेसचे आमदार अस्लम शेख यांनी काँग्रेसचे प्रभारी रमेश चन्नीथला यांच्याकडे केली आहे. (Loksabha Election 2024)

Aslam Shaikh
Pankaja Munde News : 'पंकजा मुंडेंची लोकप्रियता फडणवीसांपेक्षा काकणभर अधिकच; त्यांनी भाजप सोडून...'; कुणी दिली ऑफर?

मुंबईतून अल्पसंख्याक समाजाचे दोन आमदार आहेत. मी आणि अमीन पटेल. आम्हा दोघांपैकी कोणालाही उमेदवारी दिली तरी आमची लोकसभा निवडणूक लढण्याची तयारी आहे, असे अस्लम शेख (Aslam Shaikh ) यांनी सांगितले. अस्लम शेख हे काँग्रेस सोडणार असल्याच्या चर्चा होत्या. मात्र, या चर्चा केवळ अफवा आहेत. आपण काँग्रेसमध्येच आहोत. माझ्याविषयी खोट्या बातम्या पसरवू नयेत, असे आवाहन शेख यांनी केले.

काँग्रेसचे (Congress ) शिबिर लोणावळ्यामध्ये सुरू आहे. काही आमदार या शिबिराला उपस्थित नसल्याने ते काँग्रेस सोडणार असल्याची चर्चा होती. मात्र, या काँग्रेस आमदारांनी आपल्याशी संपर्क साधून ते उपस्थित राहणार नसल्याचे कारण सांगितले आहे. वैयक्तिक कारणामुळे काहींना उपस्थित राहता आले नाही, असे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले.

राहुल गांधींच्या न्याय यात्रेची तयारी

राहुल गांधींची भारत जोडो न्याय यात्रा उत्तर प्रदेशमध्ये आली आहे. मार्च महिन्यात ती महाराष्ट्रात प्रवेश करेल. या यात्रेची सांगत मुंबईत होणार आहे. यात्रेच्या सांगता सभेतून काँग्रेस निवडणुकीचे रणशिंग फुंकणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र काँग्रेस कमिटी तयारीला लागली आहे. यात्रा जाणाऱ्या शहरांतील स्थानिक नेत्यांवरील जबाबदारी निश्चित करण्यात आली आहे.

R

Aslam Shaikh
NitishKumar News : नितीशकुमारांचा इंडिया आघाडीबाबत मोठा खुलासा ; म्हणाले, 'हे नाव...'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com