SET Exam News: Sarkarnama
पुणे

SET Exam Result : पुणे विद्यापीठाकडून 'SET'चा अधिकृत निकाल जाहीर

सरकारनामा ब्यूरो

SET Exam Result : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून मार्च 2023 मध्ये झालेल्या प्राध्यापक पात्रता परीक्षेचे निकाल जाहीर केले आहेत. या परीक्षेत केवळ 6.59 टक्के विद्यार्थी पात्र ठरल्याचीही माहिती समोर आली आहे. (Finally the official result of 'SET' is announced)

दरम्यान, काही विद्यार्थ्यांना दोन दिवस आधीच निकालाचे मेल मिळाले होते. त्यानंंतर विद्यापीठाच्या वरीष्ठांनी तांत्रिक चुकीमुळे विद्यार्थ्यांना मेल गेले असावेत, पण अधिकृत निकाल २७ जूनलाच जाहीर होतील, असे स्पष्टीकरण दिले. त्यानंतर आता विद्यापीठाने अधिकृतरीत्या निकाल मंगळवारी जाहीर करण्यात आला. (Pune News)

महाराष्ट्र आणि गोव्यातून एकूण 71 विषयांसाठी ही परीक्षा झाली होती. या परीक्षेसाठी एक लाख 19 हजार 813 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील एक लाख एक हजार 257 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यातील सहा हजार 676 (म्हणजेच 6.59 टक्के) विद्यार्थ्यांनी पात्र ठरले. तर परीक्षा दिलेल्या 17 तृतीयपंथी विद्यार्थ्यांपैकी दोन विद्यार्थीही यात पात्र ठरले आहेत. या परीक्षेसाठी पुणे केंद्रातून 19 हजार 368 विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती. त्यातील 15 हजार 709 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. (Education News)

दोन महिन्यापूर्वी २६ मार्च २०२३ रोजी ही परीक्षा पार पडली. बुधवारी (ता.२८) या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात येणार होता. मात्र, त्यापूर्वीच सोमवारी (ता.२६) दुपारी पाच नंतर अनेक विद्यार्थ्यांच्या ई-मेलवर परीक्षेचा निकालाचे मेल आल्याचे आढळून आले. भौतिकशास्त्र विषयातील बहुतेक विद्यार्थ्यांना या संदर्भातील ई-मेल प्राप्त झाले होते. पण काहीचे मेल ओपन झाले तर काहींचे झाले नाही. निकालाच्या पीडीएफमध्ये फक्त एकूण गुणांची नोंद दाखवण्यात आली होती. पण ज्यांचा निकाल अनुत्तीर्ण आला आहे, असे विद्यार्थी संभ्रमात होते. (Maharashtra Politics)


Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT