SET Exam News:
SET Exam News:Sarkarnama

SET Exam News: 'सेट'चा निकाल फुटला: त्या ई-मेलमुळे विद्यार्थ्यांमध्ये संभ्रम

Maharashtra News: आजपर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिका फुटल्याचे ऐकले असेल, पण प्रथमच परीक्षेचा निकाल फुटल्याची बातमी समोर आली आहे.

SET EXAM News : आजपर्यंत तुम्ही प्रश्नपत्रिका फुटल्याचे ऐकले असेल, पण प्रथमच परीक्षेचा निकाल फुटल्याची बातमी समोर आली आहे. प्राध्यापक पदासाठीची राज्य पात्रता परीक्षेचा (SET EXAM) निकाल दोन दिवस आधीच फुटला आहे. अनेक विद्यार्थ्यांना निकालाचे ई-मेलही मिळाले आहेत. तर चूक लक्षात आल्याने सेट भवनाकडून तातडीची उपाययोजनाही सुरु करण्यात आली आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून (Pune University) महाराष्ट्र आणि गोवा राज्यातील प्राध्यापक पदाच्या पात्रतेसाठी सेट परीक्षेचे आयोजन करण्यात येते. दोन महिन्यापूर्वी २६ मार्च २०२३ रोजी ही परीक्षा पार पडली. बुधवारी (ता.२८) या परीक्षेचा निकाल घोषित करण्यात येणार होता. मात्र, त्यापूर्वीच सोमवारी (ता.२६) दुपारी पाच नंतर अनेक विद्यार्थ्यांच्या ई-मेलवर परीक्षेचा निकालाचे मेल आल्याचे आढळू आले.

SET Exam News:
Congress Criticize to KCR : तेलंगणचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव सिंघम नव्हे ते तर जयकांत शिखरे : काँग्रेस प्रवक्याची बोचरी टीका!

या संदर्भात वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपण या प्रकाराची दखल घेतली असल्याचं सांगितलं . ते ‘‘या संबंधी तातडीने चौकशी सुरु करण्यात आलीअसून उमेदवारांनी चिंता करु नये. परीक्षेचा अधिकृत निकाल २८ जूनला सहा वाजण्याच्या आधी घोषित केला जाईल. अशी ग्वाही दिली आहे. (Pune News) तसेच, पहिल्यांदाच उमेदवारांना त्यांच्या ई-मेलवर निकाल कळविण्यात येणार असल्याने ही प्रक्रियेतील ही तांत्रिक चूक असावी, असा अंदाजही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

नक्की काय घडलं?

- भौतिकशास्त्र विषयातील बहुतेक विद्यार्थ्यांना या संदर्भातील ई-मेल

- काहींचे ई-मेल खुले झाले तर काहींचे नाही

- निकालाच्या पीडीएफमध्ये फक्त एकूण गुणांची नोंद

- निकाल नक्की खरा आहे की खोटा, या बद्दल संभ्रम

- ज्यांचा निकाल अनुत्तीर्ण आला आहे (Maharashtra Politics)

अधिकारी म्हणतात...

- बुधवारी (ता.२८) निकाल घोषित होईल

- घडलेली घटना तांत्रिक चूक असण्याची शक्यता आहे

- 28 जून 2023 रोजी सविस्तर निकाल आणि कट ऑफ जाहीर होईल

- उमेदवारांनी अधिकृत निकालाची वाट पाहावी

SET Exam News:
Thackeray- Shinde Politics: बीएमसी कर्मचारी मारहाण प्रकरणी ठाकरे गटाच्या नेत्यावर गुन्हा दाखल; चार जणांना अटक

याबाबत बोलताना उमेदवार राजेश जाधव म्हणाले, मला पाच वाजता सेटच्या निकाला संदर्भात ई-मेल आला आहे. माझे एकूण गुण मला दिसतात, पण कोणत्या विषयात किती गुण मिळाले याचा तपशील त्यात नाही. उत्तरतालिकेशी विश्लेषण केल्यावर संबंधित गुण योग्य जुळत असल्याने मी संभ्रमात आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com