Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
पुणे

NCP Politics : बालेकिल्ल्यातच अजितदादांना धक्का? शरद पवारांची भेट घेतलेल्या माजी आमदारानं दौऱ्याकडे फिरवली पाठ

Jagdish Patil

Pune News, 09 Oct : विधानसभा निवडणुकीपूर्वी अजित पवारांच्या राष्ट्रवादीतील अनेक नेते राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षात जाणार असल्याच्या चर्चा सुरू आहेत. कारण तसे संकेत खुद्द शरद पवारांनी इंदापूर (Indapur) येथील जाहीर सभेत बोलताना दिले आहेत.

आगामी काळात आपल्या पक्षात अनेक नेते येण्यासाठी इच्छुक असल्याचं वक्तव्य त्यांनी यावेळी केलं होतं. शरद पवारांच्या वक्तव्याप्रमाणे आता हालचाली देखील पाहायला मिळत आहेत. राज्यातील अनेक नेते शरद पवारांची भेट घेत आहेत. शिवाय उमेदवारीसाठी ते मुलाखतीदेखील देत आहेत.

अशातच आता भोसरीचे माजी आमदार विलास लांडे (Vilas Lande) यांनी देखील शरद पवारांची मोदीबागेत जाऊन भेट घेतल्यामुळे ते देखील अजित पवारांची साथ सोडणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे. राष्ट्रवादीच्या फुटीनंतर अजितदादांसोबत गेलेले भोसरीचे माजी आमदार विलास लांडे शिरुरमधून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक होते.

मात्र, उमेदवारी नाकारल्यामुळे ते नाराज झाले होते. हेच लांडे आता अजित पवारांची (Ajit Pawar) साथ सोडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. कारण एकीकडे त्यांनी शरद पवारांची भेट घेतली तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या भोसरी दौऱ्याकडे पाठ फिरवली. त्यांची ही दौऱ्यातील ही गैरहजेरी सध्या चर्चेचा विषय ठरली आहे.

विलास लांडे सध्या शरद पवारांच्या (Sharad Pawar) संपर्कात असून ते तुतारी हाती घेणार असल्याचं बोललं जात आहे. या चर्चा सुरू असतानाच त्यांनी अजितदादांच्या दौऱ्यात त्यांची गैरहजेरी या चर्चांना बळ देणारी असल्याचं बोललं जात आहे. त्यामुळे अजितदादांच्या बालेकिल्ल्यातच त्यांना मोठा धक्का बसण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

दरम्यान, माजी आमदार लांडे यांना सलग दोन वेळा भोसरीतून पराभवाचा सामना करावा लागला आहे. भाजपचे आमदार महेश लांडगे यांनी त्यांना पराभूत केलं होतं. राष्ट्रवादीतील फुटीनंतर अजित पवारांसोबत गेलेल्या विलास लांडेंना लोकसभेला उमेदवारी नाकारल्यामुळे ते नाराज असल्याच्या चर्चा सुरू होत्या. याच नाराजीमुळे आता ते शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार की अजितदादांबरोबरच थांबणार? याकडे सर्वाच्या नजरा लागल्या आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT