Gajanan Marane  sarkarnama
पुणे

Gajanan Marane Arrested : मोठी बातमी! कुख्यात गुंड गजा मारणेला पोलिसांनी उचललं, मंत्र्याच्या कार्यकर्त्याला मारहाण भोवली

Gajanan Marane Pune Police Murlidhar Mohol : देवेंद्र जोग यांना मारहाण केल्यानंतर पोलिसांनी आरोपी ओम , किरण कोंडिबा पडवळ आणि अमोल विनायक तापकीर या दिघांना अटक केली होती.

Roshan More

Gajanan Marane Arrested : केंद्रीय मंत्री मुरलधीर मोहोळ यांचा कार्यकर्ता देवेंद्र जोग याला गजा मारणेच्या टोळीतील लोकांकडून मारहाण करण्यात आली होती. या मारहाण करणाऱ्यांना पोलिसांनी अटक केली होती. मारहाण करणारे गजा मारणे टोळी संबंधित असल्याने मकोका अंतर्गत टोळीवर कारवाई देखील करण्यात आली. विशेष म्हणजे टोळीचा प्रमुख गजा उर्फ गजानन मारणे याला पोलिसांनी अटक केली आहे.

देवेंद्र जोग यांना मारहाण केल्यानंतर पोलिसांनी आरोपी ओम , किरण कोंडिबा पडवळ आणि अमोल विनायक तापकीर या दिघांना अटक केली होती तर या प्रकरणातील आणखी एक आरोपी श्रीकांत पवार हा फरार होता. या प्रकरणी कोथरुड पोलिस ठाण्यात देवेंद्र जोग यांनी फिर्याद दिली होती.

केंद्रीय मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी या देवेंद्र जोग यांना मारहाण झाल्याचे समजताच त्यांच्या घरी जाऊन त्यांची भेट घेतली. या प्रकरणी कडक करावाई करण्याचा सुचना देखील त्यांनी पोलिस आयुक्त अमितेश कुमार यांना केल्या होत्या.

मुरलीधर मोहोळ यांनी देवेंद्र जोग हा एक कर्तबगार संगणक अभियंता असून अतिशय मितभाषी आणि शांत स्वभावाचा तरुण आहे. कोणाच्याही हकनाक वाट्याला न जाणाऱ्या देवेंद्रसारख्या तरुणाला मारहाण होते, हे कदापीही खपवून घेतले जाणार नाही, असा इशाराच दिला होता. अखेर पोलिसांनी गजा मारणे याला अटक केली.

मारणेला अटक केल्यानंतर केंद्रीय मंत्री मुरलधीर मोहोळ यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, पुण्यामध्ये काही घटना घडल्या. मागच्या काही दिवसांपूर्वी पोलिसांनी चांगले काम करत आहेत. काही गोष्टी कायदा सुव्यवस्था राखण्यासाठी मी सूचना केल्या होत्या. त्यातूनच ही कारवाई केल्याचे दिसते आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT