Sharad Pawar : फडणवीसांनंतर शरद पवारांकडूनही नीलम गोऱ्हेंची कानउघडणी; म्हणाले, 'ते' वक्तव्य टाळायला हवं होते...

Sharad Pawar Criticized Neelam Gorhe : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीलम गोऱ्हेंनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचे कान टोचले. त्या पाठोपाठ शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे यांना सुनावले आहे.
Sharad Pawar
Sharad Pawarsarkarnama
Published on
Updated on

Mumbai news : दिल्लीमध्ये झालेल्या मराठी साहित्य संमेलनात नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरे हे दोन मर्सिडीज घेतल्यानंतर पद देत असल्याचा दावा केला होता. त्यांच्या या वक्तव्याने महाराष्ट्रातील राजकारणात खळबळ माजली आहे. साहित्य संमेलनाच्या व्यासपिठावरून नीलम गोऱ्हे यांनी ते वक्तव्य टाळायला हवे होते. त्यांनी असे भाष्य केले नसते तर योग्य झाले असते. गोऱ्हे यांनी ते वक्तव्य करण्याची गरज नव्हती, असेही यावेळी ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नीलम गोऱ्हेंनी केलेल्या वक्तव्यावरून त्यांचे कान टोचले. त्या पाठोपाठ शरद पवार यांनी देखील पत्रकार परिषद घेत नीलम गोऱ्हे यांना सुनावले आहे.

सिल्व्हर ओकवर ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांची सोमवारी सायंकाळी पत्रकार परिषद झाली. यावेळी ते बोलत होते. दिल्लीत झालेल्या साहित्य संमेलनला मोठ्या संख्येने साहित्य रसिकांची गर्दी झाली होती. साहित्य संमेलन म्हटले की वाद असतातच. साहित्य संमेलनातील दोन्ही कार्यक्रम यशस्वी झाले असल्याचे त्यांनी यावेळी स्पष्ट केले.

Sharad Pawar
Shivsena UBT : दापोली नगरपंचायतीत ठाकरे गटाला धक्का? विषय समित्यांवर महायुतीचे वर्चस्व, योगेश कदमांनी बाजी मारली

संजय राऊत (Sanjay raut) यांनी सांगितले ते शंभर टक्के बरोबर आहे. या व्यासपीठावरून राजकीय वक्तव्य टाळले पाहिजे. नीलम गोऱ्हे यांनी एका मर्यादित काळात विविध पक्षाचा अनुभव घेतला आहे. त्यांनी यावेळी हे वक्तव्य करायला नको होते, असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar
Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा; अटकेची टांगती तलवार, काय आहे प्रकरण

साहित्य संमेलनाला प्रतिसाद चांगला होता. माझ्या अंदाजानं 60 एक हजारांच्या आसपास लोक आले होते. साहित्य संमेलनात काही ना काही वाद होतातच. साहित्य संमेलनाचे इतर कार्यक्रम तालकटोरात झाले. वादाचे स्वरुप गंभीर नव्हते. साहित्य संमेलन यशस्वी झाले. हे संमेलन दिल्लीत दुसऱ्यांदा होतं आहे. पहिलं संमेलन जे झालं त्याचं नेतृत्व नेहरूंकडे होतं. त्याचे स्वागताध्यक्ष काकासाहेब गाडगीळ होते. यावेळी पंतप्रधान मोदींवर उद्घाटनाची जबाबदारी होती. स्वागत अध्यक्ष मी होतो, असेही त्यांनी स्पष्ट केले.

Sharad Pawar
Shivsena UBT News : मर्सिडीजमधून फिरणारा होणार उबाठाचा संपर्कप्रमुख !

संजय राऊत यांनी जे सांगितलं ते १०० टक्के बरोबर आहे. प्रश्न असा आहे की, नीलम गोऱ्हे यांनी भाष्य करण्याची गरज नव्हती, हे माझं मत होतं. हे संमेल्लन चांगलं चाललं होतं. सर्वांचा सहभाग होता. त्यात नाही त्या गोष्टी काढायला नको होत्या, असेही पवार म्हणाले.

Sharad Pawar
Dhananjay Munde: धनंजय मुंडे यांच्यासाठी आजचा दिवस महत्वाचा; अटकेची टांगती तलवार, काय आहे प्रकरण

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com