Eknath Shinde, Devendra Fadnavis
Eknath Shinde, Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

Brahmin Community : कसब्यात ब्राह्मण समाजाचा मेळावा; ठिकाणे दोन, वेळ एकच, नेमकं जायचं कुठे ?

सरकारनामा ब्युरोे

Eknath Shinde and Devendra Fadnavis : कसबाचे भाजप उमेदवार हेमंत रासने यांना पाठिंबा देण्यासाठी सकल ब्राम्हण समाजाचा स्नेहमेळाव्याचे दोन वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन केले आहेत. त्यांची वेळ एकच असल्याने कोणत्या कार्यक्रमाला जायचे, असा प्रश्न समजापुढे पडला आहे.

परशुराम सेवा संघाचा कार्यक्रम कसबा पेठेतील आरसीएम गुजराती विद्यालयात होणार आहे. त्यास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) मार्गदर्शन करणार आहेत. तर सदाशिव पेठेतील फडके हॉलमधील सर्व ब्राम्हण ज्ञाती संस्थेचा स्नेहमेळावा होणार आहे. त्यास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) उपस्थित राहणार आहेत.

या दोन्ही कार्यक्रमांची वेळ आज सायंकाळी सात वाजता आहे. त्यामुळे यापैकी कोणत्या कार्यक्रमाला उपस्थित रहायचे, असा प्रश्न आता ब्राम्हण समाजापुढे पडला आहे.

कसबापेठ मतदार संघातील ब्राम्हण समाज (Brahmin Community) नाराज असल्याने येथे भाजपला फटका बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे या मतदारसंघातील समाजाची नाराजी दूर करणे क्रमप्राप्त ठरत आहे. त्यातून आज सकल ब्राम्हण समाजाच्या स्नेहमेळाव्यांचे आयोजन करण्यात आले.

यासाठी परशुराम सेवा संघ आणि सर्व ब्राम्हण ज्ञाती संस्थेने पुढाकार घेतला. त्यांनी अनुक्रमे मुख्यमंत्री शिंदे आणि उपमुख्यमंत्री फडणवीस यांना निमंत्रित केले. मात्र त्यांची वेळ एकच म्हणजे आज सायंकाळी सात वाजताची आहे. मात्र ठिकाणे वेगवेगळी आहेत.

एक कार्यक्रम कसबा पेठेतील आरसीएम गुजराती विद्यालयात तर दुसरा सदाशिव पेठेतील फडके हॉलमध्ये होणार आहे. त्यामुळे ब्राम्हण समाजापुढे आता कोणत्या कार्यक्रमाला जायचे, असा प्रश्न उपस्थित झाला आहे.

Kasba By poll election कसबा विधानसभा मतदारसंघातून भाजपने टिळक कुटंबातील सदस्यास उमेदवारी द्यावी, अशी जोरदार मागणी होती. त्यानंतर राजकीय गणिते पाहून भाजपने हेमंत रासने यांना उमेदवारी दिली. त्यानंतर ब्राम्हण समाजातून उघडपणे नाराजी व्यक्त करण्यात आली.

उमेदवारी जाहीर करण्यापूर्वी भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस, चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी शैलेश टिळक आणि कुणाल टिळक यांची भेट घेतली होती. असे असतानाही टिळक कुटुंबाने नाराजी व्यक्त केली. तसेच ब्राम्हण समाजाचे नेतृत्व कोथरुडनंतर कसब्यातूनही संपुष्टात येणार असल्याची चर्चा सुरू झाली.

ब्राम्हण समाजाच्या या नाराजीतून हिंदू महासंघाचे अध्यक्ष आनंद दवे (Anand Dave) यांनी उमेदवारी अर्ज भरला आहे. त्यानंतर भाजपने प्रचारासाठी प्रकृती ठीक नसतानाही खासदार गिरीश बापट (Girish Bapat) यांना गळ घातली. त्यातून बापट यांनी केसरीवाड्यात मेळावा घेतला. मात्र त्यांची प्रकृती ठीक नसतानाही त्यांना थेट प्रचारात उतरविल्याने ब्राम्हण समजात नाराजी पसरली. या पार्श्वभूमिवर आजच्या स्नेहमेळाव्यांचे आयोजन केले आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT