Devendra Fadnavis Sarkarnama
पुणे

फडणवीसांना पुण्यातून दिल्लीला पाठवा : ब्राह्मण महासंघाची सर्वांत आधी मागणी

भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली आहे. ही नियुक्ती म्हणजे फडणवीस हे केंद्रात जाण्याचे संकेत आहेत, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

सरकारनामा ब्यूरो

पुणे : राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) हे केंद्रात जाणार असल्याची चर्चा गेल्या काही वर्षांपासून होत आहे. त्यातच आता लोकसभेच्या (Loksabha election) आगामी २०२४ च्या निवडणुकीत फडणवीस यांना पुण्यात (Pune) उमेदवारी द्यावी, अशी मागणी अखिल भारतीय ब्राह्मण महासंघाने (Brahmin federation) थेट भारतीय जनता पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पत्र लिहून केली आहे. फडणवीसांच्या दिल्लीतील राजकारणाची सुरुवात पुण्यात व्हावी, अशी इच्छाही ब्राह्मण महासंघाने व्यक्त केली आहे. (Give Lok Sabha ticket to Devendra Fadnavis in Pune : Brahmin federation demands)

भारतीय जनता पक्षाच्या निवडणूक समितीत देवेंद्र फडणवीस यांची वर्णी लागली आहे. ही नियुक्ती म्हणजे फडणवीस हे केंद्रात जाण्याचे संकेत आहेत, अशी चर्चा राज्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. त्यांच्या निवडीनंतर दुसऱ्याच दिवशी ब्राह्मण महासंघ फडणवीस यांच्यासाठी सक्रीय झाल्याचे दिसत आहे. महासंघाच्या वतीने भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना पत्र लिहिण्यात आले आहे. त्यात २०२४ मध्ये देवेंद्र फडणवीस यांना पुण्यातून खासदारकीचे तिकिट द्यावे, अशी मागणी केली आहे.

भाजप नेत्यांना पाठविलेल्या पत्रात म्हटले आहे की, अखिल भारतीय महासंघ पुण्यात प्रत्येक निवडणुकीत भाजपच्या मागे ठामपणे उभा राहिला आहे, त्यामुळे २०२४ ला देखील फडणवीस यांना निवडून आणण्यासाठी आम्ही प्रयत्न करू. तुम्ही केंद्रीय निवडणूक समितीत फडणवीस यांची जी निवड केली आहे, ती अतिशय सार्थ आहे. दिल्लीतील राजकारणाची फडणवीस यांची सुरुवात पुण्यातून हवी, अशी इच्छादेखील महासंघाची आहे.

फडणवीस हे भाजपचे भविष्य असून नरेंद्र मोदी यांच्यानंतर सक्षम नेतृत्वाची चर्चा होते, त्यात देवेंद्र यांचे नाव अग्रभागी असते. निवडणूक समितीमधील निवड ही फडणवीस यांची राष्ट्रीय राजकारणातील सुरुवात मानली जात आहे. भाजपकडून फडणवीस यांच्यासाठी सुरक्षित मतदारसंघ शोधला जात असल्याची चर्चा दूरचित्रवाणीवर होत आहे. पुणे हा ब्राह्मण महासंघाचा गड असून फडणवीस यांच्या पाठीशी आम्ही ठामपणे उभे आहेत, त्यामुळे पुण्यातून फडणवीस यांची उमेदवारी जाहीर करावी, असे साकडेही महासंघाने भाजप नेत्यांना घातले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT