Zilla Parishad Recruitment 2023
Zilla Parishad Recruitment 2023 Sarkarnama
पुणे

MPSC च्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी! जिल्हा परिषदांमध्ये लवकरच 19 हजार जांगासाठी भरती!

सरकारनामा ब्यूरो

Pune News : स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आंनदाची बातमी समोर आली आहे. राज्यातील विविध जिल्हा परिषदांमध्ये लवकरच हजारो जागांसाठी भरती होणार आहे. राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमधील रिक्त पदांची भरती प्रक्रिया आता लवकरच सुरु होण्याचे संकेत राज्याच्या ग्रामविकास विभागाने दिले आहेत. (Zilla Parishad Recruitment)

गेली अनेक वर्षांपासून रखडलेली भरती आता लवकरच होण्याची शक्यता आहे. या कर्मचाऱ्यांच्या भरतीसाठी घेण्यात येणाऱ्या परीक्षेसांठीचा अभ्यासक्रम तयार करण्यासाठी ग्रामविकास विभागाने विविध सहा राज्यस्तरीय समित्यांची स्थापना केली आहे.

या समित्यांमध्ये ग्रामविकास खात्यातील उच्चशिक्षित आणि अनुभवी अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. राज्यातील सर्व जिल्हा परिषदांमधील मिळून 18 हजार 939 रिक्त जागांची भरती केली जाणार आहे. या भरतीसाठीची जाहिरात येत्या दोन आठवड्यात प्रसिद्ध करण्याचा निश्‍चय ग्रामविकास विभागाने केला आहे.

जिल्हा परिषदांमधील कर्मचाऱ्यांची सन 2016 पासून आतापर्यंत एकदाही भरती झालेली नाही. पूर्वी ही प्रक्रिया दरवर्षी जुलै महिन्यात सुरु केली जात असे. दरम्यान, क वर्गीय रिक्त पदांची भरती करण्यासाठी राज्य सरकारने महाभरती अंतर्गत मार्च 2019 आणि आॅगस्ट 2021 अशी दोन वेळा भरती प्रक्रिया सुरु करण्यात आली होती. मात्र, या दोन्ही भरती प्रक्रिया राज्याच्या ग्रामविकास विभागाने आक्टोबर 2022 मध्ये रद्द केल्या होत्या.

दरम्यान, त्या शिवाय या दोन्ही भरती प्रक्रियेत नोकरीसाठी अर्ज केलेल्या सर्व उमेदवारांना त्यांचे परीक्षा शुल्क परत करण्याचा निर्णयही घेण्यात आला होता. दरम्यान, आता पुन्हा एकदा राज्यातील सर्वच जिल्हा परिषदांमध्ये लवकरच जवळपास 19 हजार कर्मचाऱ्यांची भरती होणार असल्यामुळे स्पर्धा परिक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी (MPSC) ही मोठी संधी असणार आहे.

Edited By : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT