Buldhana News : काँग्रेसला मोठा धक्का; 'त्या' फुटीर आठ नगरसेवकांबाबत जिल्हाधिकाऱ्यांचा मोठा निर्णय

Congress News : काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी पक्षापासून वेगळे होऊन वेगळा गट स्थापन करत मान्यता देण्याची मागणी केली होती.
Congress
CongressSarkarnama
Published on
Updated on

Motala Nagar Panchayat : काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी पक्षापासून वेगळे होऊन वेगळा गट स्थापन करत मान्यता देण्याची मागणी बुलढाणा जिल्हाधिकाऱ्यांकडे केली होती. अखेर जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांच्या गटाला मान्यता दिली आहे. त्यामुळे काँग्रेसला मोताळामध्ये मोठा धक्का बसला आहे.

मोताळा नगरपंचायतमध्ये विकास कामे होत नसल्यामुळे काँग्रेस नेतृत्वाला कंटाळून आठ नगरसेवकांनी आमदार संजय गायकवाड यांना सहकार्य करण्यासाठी काँग्रेसमधून फुटून वेगळा गट स्थापन करत वेगळ्या गटाची मागणी जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी त्यांची मागणी मान्य केल्यामुळे काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.

एक वर्षापूर्वी झालेल्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये काँग्रेसचे 17 पैकी 12 सदस्य निवडून आले होते. नगरपंचायतमध्ये काँग्रेसची एखादी सत्ता येऊन माधुरी देशमुख या नगराध्यक्षपदी विराजमान झाल्या होत्या. मात्र, मोताळा शहरामध्ये कोणतीही विकास कामे होत नसल्यामुळे काँग्रेसच्या आठ नगरसेवकांनी पक्षापासून वेगळे होऊन वेगळा गट स्थापन केला होता.

Congress
Pusad Bazar Samiti : पुसद बाजार समितीवर मनोहर नाईक, इंद्रनील नाईकांचे वर्चस्व कायम; निलय नाईकांना धक्का!

त्यानंतर त्या नगरसेवकांना अपात्र घोषित करण्यासाठी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राहुल बोंद्रे यांनी जिल्हाधिकारी बुलढाणा यांच्याकडे याचिका दाखल केली होती. काँग्रेसचे आठ सदस्य हे पक्षाच्या चिन्हावर निवडून आले असून सर्व काही सुरळीत असताना त्यांनी बाळासाहेबांची शिवसेना (शिंदे गट) या पक्षामध्ये प्रवेश केला. त्यामुळे त्यांना पक्षांतर बंदी कायदा लागू होतो. ते या सदस्य पदावर राहण्यास अपात्र आहे, असे याचिकेमध्ये त्यांनी नमूद केले होते.

Congress
Nashik APMC Result : ना महाविकास आघाडी, ना भाजप, मतदारांचा प्रस्थापितांना कौल

या 8 सदस्यांनी काँग्रेसची विचारसरणी न पटल्यामुळे आपण शहर विकास आघाडी नावाने वेगळा गट स्थापन केला असून याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालय यांना दिली होती. त्या प्रमाणे महाराष्ट्र स्थानिक प्राधिकरण सदस्य अधिनियम 1986 चे कलम 5 नुसार पक्षांतर कारणावरून झालेली अयोग्यता विलनीकरणाच्या बाबत लागू होत नाही.

कलम 5(2) नुसार सभासदांच्या किंवा त्यांच्या मूळ राष्ट्रीय पक्षाचे विलीनीकरण हे संबंधित पंचायत समिती पक्षाच्या दोन तृतीयांश कमी नाही, इतक्या सदस्यांनी अशा विलनीकरणास परवानगी दिली असेल ते अयोग्य होत नाहीत, 12 पैकी आठ सदस्य नवीन गटांमध्ये विलीन झाले आहेत.

त्यामुळे तरतुदीनुसार त्या पात्र ठरत नाही, सिद्ध करण्यासाठी नामनिर्देशित सदस्यांची संख्या विचारात घेतले जात नाही. त्यामुळे काँग्रेस पक्षाचे अपील खारीज करण्यात यावे, अशी विनंती त्यांनी केली होती.

Congress
APMC Election : खेड बाजार समितीवर दिलीप मोहिते यांचीच बाजी ; राष्ट्रवादीला १० जागा..

दोन्ही बाजूचा युक्तिवाद ऐकून जिल्हाधिकारी बुलढाणा यांनी काँग्रेस पक्षाचे आठ सदस्यांचा युक्तिवाद योग्य ठरेल, असा निर्णय देत त्यांना वेगळा गट म्हणून मान्यता दिली आहे. त्यांना वेगळा गट म्हणून मान्यता दिल्यामुळे मोताळा नगरपंचायतमधील काँग्रेसची एक हाती सत्ता ही संपूर्णपणे संपुष्टात आली आहे.

या 8 नगरसेवकांनी आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली व मार्गदर्शनाखाली विशाल विकास आघाडी शिवसेनेच्या चार सदस्यांसोबत काम करेल, असे ठरवल्यामुळे लवकरच नगरपंचायतमध्ये काँग्रेसची सत्ता संपुष्टात येऊन त्या ठिकाणी आमदार संजय गायकवाड यांच्या नेतृत्वाखालील सत्ता स्थापन होण्याची शक्यता आहे.

या सदस्यांमध्ये पुष्पाताई चंपालाल जैन, शहनाज बी शेख सलीम, शेख तसलीम शेख सलीम, खातून बी शेख रशीद हस मत बी जलील खान, शीला कैलास खर्चे, सरिता विजय सुरडकर, परविन बी शेख आसिफ यांचा समावेश आहे.

Edited By : Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com