पुणे : कोरोनामुळे गेल्या दोन वर्षात राज्य लोकसेवा आयोगाच्या परीक्षा स्थगित करण्यात आल्या होत्या.या काळात परीक्षेची संधी हुकलेल्या विद्यार्थ्यांना वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत देण्याचा महत्वपूर्ण निर्णय राज्य मंत्रीमंडळाच्या आजच्या बैठकीत घेण्यात आला. या निर्णयामुळे गेल्या अनेक दिवसांची विद्यार्थ्यांची मागणी पूर्ण झाली आहे.
विद्यार्थ्यांच्या मागणीचा विचार करून वयोमर्यादेत एक वर्षाची सवलत देण्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केले होते. मात्र, तसा अधिकृत निर्णय होत नव्हता.राज्य मंत्रीमंडळाच्या बैठकीत हा निर्णय आज घेण्यात आला.हा निर्णय झाला नसता तर गेल्या वर्षी वयोमर्यादा संपलेल्या विद्यार्थ्याला परीक्षेला बसता येणार नव्हते. राज्य सरकारच्या या निर्णयाने स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
राज्यातील कोरोनाच्या संकटामुळे जवळपास दोन वर्ष लोकसेवा आयोगाचे वेळापत्रक कोलमडले होते. या काळात परीक्षाच न जाल्याने वय उलटून गेलेल्या विद्यार्थ्यांचे नुकसान होणार होते. मात्र, राज्य सरकारच्या या निर्णयाने हजारो मुलांना दिलासा मिळणार आहे. दोन वर्षांची मुदत वाढविण्याची विद्यार्थ्यांची मूळची मागणी होती. मात्र, राज्य सरकारने एक वर्षाची मागणी मान्य केली आहे.
गेल्या दीड-दोन वर्षात ज्या परीक्षा जाहीर झाल्या होत्या. मात्र, त्या परीक्षा होऊ शकल्या नाहीत. अशा राज्य सरकारच्या सर्वच परीक्षांना एक वर्षाच्या वयोमर्यादेची सवलत मिळणार आहे.या निर्णयामुळे राज्यातील हजारो विद्यार्थ्यांची एमपीएससीची परीक्षा देण्याची एक संधी वाढणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.