Voter Registration News : महाराष्ट्र विधान परिषदेच्या पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने पात्र पदवीधर व शिक्षक मतदारांनी मतदार यादीत नाव नोंदविण्यासाठी २६ सप्टेंबरपर्यंतची मुदत आहे. त्यामुळे आज (शनिवार) मतदार नोंदणीचा शेवटचा दिवस आहे.
पुणे विभाग पदवीधर व शिक्षक मतदारसंघासाठी मतदार यादीची प्रक्रिया सुरू असून पात्र मतदारांना ऑनलाइन पद्धतीने नोंदणीची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे अद्याप मतदार म्हणून नोंदणी न केलेल्या पात्र पदवीधर व शिक्षकांनी मुदतीपूर्वी आपली नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनी केले आहे.
पदवीधर मतदारसंघासाठी पात्र पदवीधरांनी आवश्यक कागदपत्रांसह नमुना १८, तर शिक्षक मतदारसंघासाठी पात्र शिक्षकांनी नमुना १९ अनुषंगाने अर्ज करावा. शिक्षक मतदारांसाठी संबंधित संस्थेच्या प्रमुखांचे प्रमाणपत्र आवश्यक आहे. या प्रक्रियेबाबतची माहिती तसेच ऑनलाइन नोंदणीची सुविधा मुख्य निवडणूक अधिकारी, महाराष्ट्र यांच्या mahaelection.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
मतदार म्हणून नोंदणी करण्यासाठी पात्रता असलेल्या नागरिकांनी शेवटच्या दिवसाची प्रतीक्षा न करता शक्य तितक्या लवकर ऑनलाइन अर्ज सादर करावा. मतदार यादीमध्ये आपले नाव नोंदविणे ही निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी महत्त्वाची बाब असून पात्र पदवीधर व शिक्षकांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी डुडी यांनी केले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.