Khed Bazar Samiti Election
Khed Bazar Samiti Election Sarkarnama
पुणे

Khed Bazar Samiti Election : ग्रामपंचायत सदस्याचा बाणेदारपणा : बाजार समिती निवडणुकीत मिळालेली पाकिटे केली परत; पैसे दान केले!

रूपेश बुट्टे पाटील

आंबेठाण (जि. पुणे) : खेड (Khed) तालुक्यातील जनतेने कृषी उत्पन्न बाजार समितीच्या (Bazar samiti) निवडणुकीत ‘सबसे बडा रुपया’ ठरल्याची परिस्थिती पहिली. ही सर्व निवडणूक पैशावर झाली, असे तालुक्यातील जनता खुलेआम बोलत आहे. पण, कोरेगाव बुद्रुक (ता. खेड) ग्रामपंचायतीच्या महिला सदस्याने मतदान देण्यात आलेली रक्कम संबंधित उमेदवाराला परत केली, तर काही रक्कम अनाथ आश्रमाला दान केली. त्याची पावतीही संबंधितांना देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. (Gram panchayat member returned money received in the Khed Bazar Samiti elections)

कामिनी अर्जुन गोगावले या कोरेगाव बुद्रूक ग्रामपंचायतीच्या सदस्या आहेत. त्यांचे पती अर्जुन गोगावले यांनीही यापूर्वी कोरेगाव बुद्रूकचे सरपंच म्हणून काम पाहिले आहे. खेड तालुक्यात नुकत्याच झालेल्या बाजार समितीच्या निवडणुकीत ग्रामपंचायत सदस्य म्हणून मतदार असलेल्या गोगावले यांना वेगवेगळ्या उमेदवारांची मिळून रोख स्वरूपात २८ हजार आणि ३५ हजार रुपयांची बंद पाकिटे आणि काही भेटवस्तू आल्या होत्या.

गोगावले यांनी ही ३५ हजार रुपयांची पाकिटे संबंधित जवळच्या उमेदवारांना तत्काळ साभार परत केली आणि उर्वरित २८ हजारांची पाकिटे ठाकूर पिंपरी येथील अनाथ आश्रमातील मुलांच्या दैनंदिन खर्चासाठी दिली. विशेष म्हणजे ही पाकिटे ज्या उमेदवारांच्या प्रतिनिधीने दिली, त्यांच्याच नावाने पैसे दान केल्याची पावती केली असून ही पावती संबंधित उमेदवारांना पाठविणार असल्याचे गोगावले यांनी सांगितले.

ही सर्व पाकिटे गोगावले यांनी आश्रमात गेल्यावर मुलांसमोर उघडली. या शिवाय मतदारांना आलेल्या वस्तुरुपी भेटवस्तूही या वेळी आश्रमात देण्यात आल्या. तसेच, स्वखर्चाने या वेळी या मुलांना खाऊ वाटप करण्यात आले.

आजकाल सगळेच पैशाच्या मागे धावत आहेत. त्यातही निवडणुकीत मतदानासाठी वाटलेले पैसे स्वतःच्या खिशात न घालता ते अनाथ आश्रमात मुलांच्या खर्चासाठी देऊन कामिनी गोगावले यांनी एक वेगळा पायंडा समाजात पाडला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT