अक्कलकोट : अक्कलकोट कृषी उत्पन्न बाजार समितीवर (Bazar samiti) माजी आमदार सिद्रामप्पा पाटील आणि आमदार सचिन कल्याणशेट्टी (Sachin Kalyanshetti) यांच्या गटाने बहुमत मिळविले असून १८ पैकी १२ जागांवर विजय मिळविला. सर्वपक्षीय आघाडीला ६ जागा मिळाल्या. ‘क्रॉस वोटिंग' मतदानाचा फटका काही उमेदवारांना बसला आहे. माजी आमदार सिद्धाराम म्हेत्रे प्रणित सर्वपक्षीय आघाडीचा पराभव झाला.(Victory of Sidramappa Patil-Sachin Kalyanshetti panel in Akkalkot Bazar Samiti elections)
माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, गोकुळ शुगरचे दत्ता शिंदे, कपिल शिंदे, राष्ट्रवादीचे दिलीप सिद्धे, जनसेवा संघटनेचे तुकाराम बिराजदार यांच्या सर्वपक्षीय आघाडीला माजी राज्यमंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांचा आशीर्वाद होता. त्यांच्या विरोधात माजी आमदार सिद्रामप्पा पाटील यांचे पॅनेल उभे होते. त्यांना आमदार सचिन कल्याणशेट्टी यांचा सक्रिय पाठिंबा होता. मात्र, माजी आमदार सिद्रामप्पा पाटील व आमदार सचिन कल्याणशेट्टी यांनी सर्वपक्षीय आघाडीला पराभवाचा जोरदार झटका दिला.
आमदार कल्याणशेट्टी यांच्या सक्रिय पाठबळाचा माजी आमदार पाटील यांच्या पॅनेलला मोठा फायदा झाला. माजी सभापती मल्लिकार्जुन पाटील यांच्या सर्वपक्षीय पॅनेलचा पराभव झाला. या निकालाचा परिणाम आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीवर होणार असून याचा फायदा भाजपाला होण्याची शक्यता आहे. सोसायटी मतदारसंघात ११ पैकी १० जागा जिंकत माजी आमदार पाटील यांनी सहकारातले वर्चस्व दाखवून दिले.
सोसायटी मतदारसंघात केवळ मल्लिकार्जुन पाटील हे एकमेव सर्वपक्षीय आघाडीचे उमेदवार विजयी झाले आहेत. आघाडीला दुसरी जागा हमाल तोलार मतदारसंघातून मिळाली आहे, तर ग्रामपंचायत मतदार संघातील सर्वच्या सर्व चार जागा सर्वपक्षीय आघाडीला मिळाल्या आहेत.
अंतिम मतमोजणीनंतर विजयी व पराभूत उमेदवारांना पडलेली मते पुढील प्रमाणे.
सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवारांना पडलेली मते : बाबुराव सिद्धाप्पा करपे-३५३ मते (विजयी), सुरेश भिमशा गड्डी- ३३१ मते, बसवराज शरणप्पा तानवडे-३३४ मते, अप्पासाहेब बसवण्णा पाटील-३५४ मते(विजयी),मल्लिकार्जुन महादेव पाटील-३५७ मते(विजयी),संजीव सिद्रामप्पा पाटील-३७८ मते (विजयी), सिद्रामप्पा मलकप्पा पाटील-३७६ मते(विजयी), कामगोंडा संगणबसप्पा बाके-३४८ मते(विजयी), धनराज चंद्रकांत बिराजदार-३४० मते(विजयी),सुमित तुकाराम बिराजदार-३२९ मते, रविकिरण श्रीशैल वरनाळे-३२२ मते,विठ्ठल निलप्पा विजापुरे-३३७ मते,कपिल बलभीम शिंदे-३३१ मते,महांतेश लक्ष्मण हत्तुरे-३०९ मते,चनमलप्पा सिद्रामप्पा हालोळे-०५ मते.
सहकारी संस्था सर्वसाधारण महिला राखीव मतदारसंघातील उमेदवारांना पडलेली मते : विठाबाई शेकप्पा कलकुटके(अपक्ष)-०८ मते, शकुंतला बाजीराव खरात-३५० मते,शिवमंगल धोंडप्पा बिराजदार- ३७० मते(विजयी), सुवर्णा गुरुनिंगप्पा मलगोंडा-३४१ मते,पार्वतीबाई इरय्या स्वामी-३५३ मते(विजयी). सहकारी संस्था इतर मागासवर्गीय मतदारसंघातील उमेदवारांना पडलेली मते : अशपाक गुडूमिया अगसापुरे-३४५ मते, प्रकाश भीमराव कुंभार-३७७ मते (विजयी). सहकारी संस्था भटक्या जाती/विमुक्त जमाती मतदारसंघातील उमेदवारांना पडलेली मते : राजेंद्र धूळप्पा बंदीछोडे-३७७ मते (विजयी), शिवयोगी सिद्धप्पा पुजारी-३४७ मते.
ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातील उमेदवारांना पडलेली मते : मल्लिनाथ पंडित ढब्बे-१७३ मते, कार्तिक बळीराम पाटील- ४४५ मते(विजयी), आदित्य सुनील बिराजदार-१७६ मते, रेवनप्पा बसवणप्पा मडीखांबे(अपक्ष) -४६ मते, शिवयोगी कामण्णा लाळसंगी-४१५ मते(विजयी),निरंजन बसवंतप्पा हेगडे(अपक्ष)-० मते. ग्रामपंचायत अनुसूचित जाती-जमाती मतदारसंघातील उमेदवारांना पडलेली मते : यशवंत खंडू इंगळे-१५८ मते, सिद्धार्थ रघुनाथ गायकवाड- ४६९ मते(विजयी), राहुल सिद्धाराम रूही(अपक्ष)-१६ मते.
ग्रामपंचायत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक मतदारसंघातील उमेदवारांना पडलेली मते : लक्ष्मीबाई शिवशरण पोमाजी-१८३ मते, प्रकाश सिद्धाराम बिराजदार-४६६ मते(विजयी). हमाल तोलार मतदारसंघातील उमेदवारांना पडलेली मते : गायकवाड उमेश आमसिद्ध(अपक्ष)-७ मते, यल्लप्पा गुरप्पा ग्वल- ५९ मते(विजयी). व्यापारी मतदारसंघातील उमेदवारांना पडलेली मते : बसवराज शंकर माशाळे-८४ मते(विजयी), श्रीशैल स्वामिराव घिवारे-८४ मते (विजयी), शंकर बसवराज माशाळे(अपक्ष)-५ मते,महम्मद हुसेन अ.गफुर शेरीकर (अपक्ष)-० मते,विजयकुमार शिवशरणप्पा कापसे(अपक्ष)-७४ मते.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.