ACB trapp, Maval Latest News Sarkarnama
पुणे

काय सांगता! सरपंचासह ग्रामसेवकही लाच घेताना ACB च्या जाळ्यात...

Crime : मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी आरोपींनी ही लाच मागितली होती.

सरकारनामा ब्यूरो

पिंपरी : गेल्या वर्षभरापासून पिंपरी-चिंचवडसह व लगतच्या मावळ तालुक्यात लाचखोरीचे प्रमाण वाढत चालले आहे. गेल्या महिन्यात २४ तारखेला महावितरणच्या भोसरी उपविभाग कार्यालयातील कनिष्ठ अभियंता संतोषकुमार गित्ते याला पन्नास हजार रुपयांची लाच घेताना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) पकडले होते. तर, ३ ऑगस्टला पिंपरी-चिंचवड महापालिकेचा सर्व्हेअर संदीप लबडे याला तीन लाखांची लाच मागितली म्हणून त्यांनी अटक केली होती, त्यानंतर आज मावळ तालुक्यात (जि.पुणे) कुसगाव खुर्द ग्रामपंचायत कार्यालयातच त्यांनी लाचेची कारवाई (ट्रॅप) केली. (Maval Crime News)

कुसगाव खुर्द ग्रामपंचायतीचे सरपंच अनिल बाळू येवले (वय ३३) आणि ग्रामसेवक अमोल बाळासाहेब थोरात यांना आठ हजार रुपयांची लाच घेताना ग्रामंपंचायतीतच पकडण्यात आले. त्यानंतर पंचक्रोशीत खळबळ उडाली आहे. त्यांनी दहा हजार रुपये लाच मागितली होती. नंतर, आठ हजारावर तडजोड केली होती.

गावातील एका तरुणाच्या चुलत आजी,आजोबा यांचे मृत्यू प्रमाणपत्र देण्यासाठी आरोपींनी ही लाच मागितली होती. तसेच या तरुणाच्या चुलत आजोबांच्या मृत्यू प्रमाणपत्रासाठी केलेला मागणी अर्ज व हरकत अर्जाच्या प्रती मिळण्याकरिता ग्रामपंचायतीकडे २६ तारखेला अर्ज केला होता. ते देण्यासाठी सरपंचांनी दहा हजार रुपये मागितले. ते घेण्यासाठी ग्रामसेवकाने त्यांना प्रोत्साहन दिले. म्हणून दोघांनाही एसीबीने आरोपी करण्यात आले आहे.

या तक्रारीची पुणे एसीबीने काल पडताळणी केली असता त्यात तथ्य आढळले. म्हणून त्यांनी सापळा लावला अन् त्यात लाच घेताना सरपंच आज सापडले. याबाबत कामशेत पोलिस ठाण्यात लाचखोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. एसीबीच्या डीवायएसपी सीमा आडनाईक पुढील तपास करीत आहेत. शासकीय अधिकारी वा कर्मचाऱ्याने लाचेची मागणी केल्यास १०६४ या टोल फ्री नंबरवर संपर्क साधण्याचे आवाहन पुणे एसीबीचे डीवायएसपी (प्रशासन) श्रीहरी नाईक यांनी केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT