Nitin Pophale Sarkarnama
पुणे

Grandma Found Her Way Back : लेकीकडे निघालेली आजी वाट चुकली, अन् कन्याकुमारीला पोहोचली

Sudesh Mitkar

Pune News : दीड वर्षापूर्वी औरंगाबादला लेकीकडे निघालेली मालेगावच्या सत्तर वर्षांच्या सखूबाई सीताराम खाजगे आजी दौंड स्थानकावर चुकीच्या गाडीत बसून थेट कन्याकुमारीजवळ वेल्लुर येथे पोहोचल्या. त्या मानसिक आजारी असल्यामुळे त्यांना शोधणे कुटुंबाला अवघड गेले. सर्व प्रयत्न संपले असताना भाजपचे मालेगाव येथील नगरसेवक नितीन पोफळे यांच्या मदतीने आजीला परतीचा मार्ग सापडला. 

लेकीकडे निघालेली आजी चुकीच्या रेल्वेमध्ये बसून वेल्लूर येथे उतरल्या. त्यानंतर येथील एका वीज कर्मचाऱ्याने त्यांना मदतीचा हात देत आठ दिवस आपल्या घरी ठेऊन घेतले. आणि आजीच्या कुटुंबाची माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्यांना फारशी माहिती मिळाली नाही. त्यामुळे त्यांनी आजीला वृद्धाश्रमात दाखल केले.  

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

दुसरीकडे आजी हरवल्याने फाजगे कुटुंबीय त्यांचा शोध घेत होते. या दरम्यान भाजप नगरसेवक पोफळे यांच्या पुतण्याला त्याच्या मुंबईच्या मित्राकडून या हरवलेल्या आजीबाबत माहिती मिळाली. त्यानंतर त्यांनी औरंगाबाद महापालिकेच्या आयुक्तांनाच मदतीने मालेगाव येथे खाजगे परिवाराला संपर्क करत आजी सापडली असल्याचे सांगितले. 

कसा झाला संपर्क ? 

आज्जी केवळ मराठी बोलत असल्याने वृद्धाश्रमातील कर्मचारी मरियान दास यांनी पुण्यात नोकरी करणाऱ्या आपल्या मुलीशी संपर्क करून तिला घरी बोलाविले. त्या मुलीने आजीची मुलगी औरंगाबादला तर घर मालेगाव येथे आहे, हे निश्चित केले.

त्यानंतर मालेगावला माजी नगरसेवक पोफळे यांच्याशी संपर्क झाला आणि आजी आपल्या घरी पोहोचू शकली. ही माहिती मिळाल्यावर आजीचा नातू सागर याने राजू बोरसे आणि अजय सोनवणे यांना बरोबर घेऊन वेल्लूर गाठले. त्यांना पाहिल्यावर आजीच्या डोळ्यातून घळघळा अश्रू वाहू लागले. त्यांनी नातवाला मिठी मारत मला घरी घेऊन चल, असं म्हणत टाहो फोडला. 

(Edited by Sudesh Mitkar)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT