Chandrakant Patil and Dheeraj Ghate  Sarkarnama
पुणे

Pune BJP News: भाजप शहराध्यक्षांचा पाय मुरगळला अन् पालकमंत्री झाले 'डॉक्टर'

Chandrakant Patil and Dheeraj Ghate : पालकमंत्र्यांनी शहराध्यक्षांच्या पायाची मालिश केल्याने त्यांच्या या कृतीची चांगलचीच चर्चा रंगली.

ब्रिजमोहन पाटील

Pune News: राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय समन्वय बैठकीला गुरुवारपासून स.प.महाविद्यालयामध्ये सुरवात झाली. यावेळी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांचा तोल गेला आणि पाय मुरगळा. मात्र, हे पाहताच पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी त्यांच्या गाडीतील तेल आणून घाटे यांच्या पायाची मालिश करुन दिली. शहराध्यक्षांच्या पायाची मालिश थेट पालकमंत्र्यांनी केल्याने त्यांच्या या कृतीची चांगलचीच चर्चा रंगली.

सरसंघचालक डॉ.मोहन भागवत आणि सरकार्यवाह दत्तात्रेय होसबळे यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून बैठकीचा प्रारंभ करण्यात आला. यावेळी संघाचे सरकार्यवाह डॉ.कृष्णगोपाल, डॉ.मनमोहन वैद्य, अरुण कुमार, मुकुंदाजी यांच्यासह आदी उपस्थित होते.

या बैठकीत देशातील सध्याची परिस्थिती, राष्ट्रीय सुरक्षा, पर्यावरण, कुटुंब प्रबोधन, सामाजिक समरसता, नागरी कर्तव्याच्या विषयांना अधिक गती देण्यासाठी चर्चा करण्यात येणार आहे. याबरोबरच संघ आणि परिवारातील संघटनांचा विस्तार करण्यासाठी या बैठकीत चर्चा होणार असून या बैठकीचा शनिवारी समारोप होणार आहे.

भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डा या बैठकीसाठी पुण्यात आले होते. यावेळी त्यांना स.प.महाविद्यालयातील बैठकीच्या ठिकाणी सोडविण्यासाठी भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, पालकमंत्री चंद्रकांत पाटील व शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह इतर कार्यकर्ते गेले होते. पण याच वेळी धीरज घाटे यांचा पाय मुरगळ्याने तोल गेला.

चंद्रकांत पाटील यांच्या हे लक्षात येताच त्यांनी घाई-घाईने चालत जाऊन त्यांच्या गाडीतून तेल आणले व खाली बसून जवळपास पाच मिनिटे त्यांनी घाटे यांच्या पायाची मालिश करून दिली. संघाच्या बैठकीच्या ठिकाणीच हा प्रसंग घडल्याने त्यांच्यातील संघ स्वयंसेवक दिसून आल्याची प्रतिक्रिया अनेक पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली. घाटे यांनीही यास दुजोरा दिला.

Edited by Ganesh Thombare

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT