Sharad Pawar VS Ajit Pawar : राष्ट्रवादी पक्ष कुणाचा ? निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला बोलावलं

NCP Crisis : राष्ट्रवादी पक्ष कुणाचा ? शरद पवार की अजित पवार; निवडणूक आयोगाने दोन्ही गटाला बोलावलं
Sharad Pawar and Ajit Pawar
Sharad Pawar and Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News: राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर आता पक्षाच्या चिन्हाचा वाद थेट निवडणूक आयोगात पोहचला आहे. राष्ट्रवादीत शरद पवार गट आणि अजित पवार असे दोन गट निर्माण झाले असून आता दोन्ही गटात पक्षाचे नाव आणि चिन्हासाठी कायदेशीर लढाई सुरु झाली आहे.

येत्या ६ ऑक्टोबरला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाबाबत निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. निवडणूक आयोगाने राष्ट्रवादीच्या दोन्ही गटाला ६ ऑक्टोबरला बोलावलं असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे चिन्ह आणि पक्ष नेमकं कुणाचे, यावर आयोगामध्ये सुनावणी होण्याची शक्यता आहे.

Sharad Pawar and Ajit Pawar
Aaditya Thackeray In Marathwada: मंत्रीमंडळ मराठवाड्यात येण्याआधीच आदित्य ठाकरेंचा दौरा..

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यासह काही राष्ट्रवादीच्या आमदारांनी बंड केल्यानंतर पक्षात संघर्ष सुरु झाला. पक्षात फूट पडल्यानंतर दोन्ही गटांनी खरा पक्ष आपल्याकडेच असल्याचा दावा केला. त्यानंतर हा वाद थेट निवडणूक आयोगापर्यंत पोहचला. यानंतर शरद पवार यांच्या गटाकडून पक्षात फूट पडली नसल्याचे स्पष्टीकरण देत शरद पवार हेच पक्षाचे अध्यक्ष असल्याचे सांगण्यात आले.

यानंतर आयोगाने आता राष्ट्रवादीच्या दोन्ही गटांना बोलावलं असून होणाऱ्या सुनावणीत शरद पवार गट आणि अजित पवार गट हे दोन्ही गट आपली भूमिका निवडणूक आयोगासमोर मांडणार आहेत. त्यामुळे दोन्ही गट काय भूमिका मांडतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

Edited by Ganesh Thombare

Sharad Pawar and Ajit Pawar
Delhi Liquor Scam: दिल्ली मद्य घोटाळा प्रकरणात नवा ट्विस्ट; तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांच्या मुलीला ईडीचे समन्स

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com