Sunil Shelke
Sunil Shelke Sarkarnama

Sunil Shelke News: "...तर आमदारकीचा राजीनामा देणार!"; अजित पवार गटाच्या सुनील शेळकेंचं खळबळजनक विधान

Maval Political News : '' मराठा आरक्षण प्रश्नी सरकारला रिझल्ट हा द्यावाच लागणार....''
Published on

Pimpri Chinchwad News: पिंपरी-चिंचवड शहराला मावळातील पवना धरणातून बंद जलवाहिनीतून पाणी आणण्याच्या योजनेवरील स्थगिती स्थानिक शेतकऱ्यांचा तीव्र विरोध असूनही त्यांना विश्वासात न घेता बारा वर्षानंतर राज्य सरकारने नुकतीच उठवली. ती अजित पवार हे सत्तेत सामील झाल्यावर उठली असा आरोप मावळातील शेतकऱ्यांनी केल्याची चर्चा आहे. तो जर सिध्द झाला,तर आपण आमदारकीचा राजीनामा देऊ,असे आव्हान मावळचे राष्ट्रवादी कॉंग्रेसचे अजित पवार गटाचे आमदार सुनील शेळके यांनी गुरुवारी दिले.

पवना बंद जलवाहिनी प्रकल्पामुळे बाधीत होणाऱ्या मावळातील शेतकऱ्यांना विश्वासात घेतल्याशिवाय या प्रकल्पाचे काम सुरु करणार नाही,असा शब्द उपमुख्यमंत्री अजित पवारांनी गुरुवारी (ता.१४) सुनील शेळकेंना (Sunil Shelke) दिला. त्याविषयी व एकूणच या प्रकल्पावर आपली भूमिका स्पष्ट करण्यासाठी सायंकाळी त्यांनी सायंकाळी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी अजितदादा सत्तेत आले अन् ही बंदी उठली,असे काही शेतकरी म्हणत आहेत,असा एक प्रश्न त्यांना विचारला असता ते खरे असेल,तर आमदारकीचा राजीनामा देईन,असे आव्हान त्यांनी दिले.

Sunil Shelke
Hasan Mushrif Vs Sanjay Mandlik : शिंदे गटाचे विनाकारण आकांडतांडव; अजित पवार गटाचा पलटवार

मी अजित पवारांच्या (Ajit Pawar),मावळचे खासदार श्रीरंग बारणे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे,तर मावळचे माजी आमदार आणि माजी मंत्री (बाळा भेगडे) हे दुसरे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे असूनही मावळवासियांना आंदोलन करण्याची वेळ येते म्हणजे आम्ही अपयशी का,अशी उपरोधिक विचारणा त्यांनी केली

मराठा समाजाला आरक्षण(Maratha Reservation) मिळावे ही सर्वांचीच भावना आहे,असे आमदार शेळकेंनी यावेळी स्पष्टपणे सांगितले. पण त्यात कुणी राजकारण आणू नये असे आवाहनही केले. याप्रश्नी सरकारला रिझल्ट हा द्यावाच लागणार आहे,असे ते म्हणाले. मी मराठ्याची औलाद आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले.

मराठा आरक्षण आंदोलन हे नेत्यांनी हातात घ्यावे, त्यांनी आमरण उपोषण करावे या शब्दांत त्यांनी या प्रश्नाचे गांभीर्य किती मोठे आहे हे सांगितले. पवना बंद जलवाहिनी प्रकल्पावरील बंदी उठवताना राज्य सरकारने स्थानिक खासदार वा आमदारांना विश्वासात घेतले नाही, म्हणजे या प्रश्नांचं गांभीर्य गेलंय,असं सरकारला वाटतं,असा घरचा आहेर त्यांनी दिला. त्याचवेळी ते प्रत्येक निर्णय आम्हाला विचारून घेणार नाहीत,हे ही त्यांनी प्रांजळपणे कबूल केले.

तसेच बंदी उठविण्याच्या निर्णय़ाविरोधात आणि तो रद्द करण्याच्या मागणीसाठी बुधवारी झालेल्या सर्वपक्षीय कृती समितीच्या बैठकीला न बोलवल्याबद्दल आमदार शेळकेंनी यावेळी नाराजी व्यक्त केली.

(Edited By Deepak Kulkarni)

Sunil Shelke
IAS Officer Transfer : 'सरकारनामा'चा दणका, 'आयएएस' अश्विनी जोशी यांची थेट बदलीच, 'ई- लायब्ररी'चे टेंडर भोवले

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com