Sharad Pawar sarkarnama
पुणे

Sharad Pawar News : शरद पवारांनी संभाव्य संकटाबाबत सरकारला केले सतर्क; म्हणाले, ही चिंतेची व गंभीर बाब!

PMC GBS Guillian Barre Syndrome outbreak in Pune : पुण्यामध्ये प्रामुख्याने सिंहगड रस्ता परिसरात गुलियन बॅरी सिंड्रोम आजाराचे अनेक रुग्ण आढळून आले आहेत.

Rajanand More

Pune Health News : पुण्यामध्ये पुन्हा एकदा आरोग्याचे गंभीर संकट घोंघावू लागले आहे. 'जीबीएस' अर्थात गुलियन बॅरी सिंड्रोम या आजाराचे अनेक रुग्ण शहराच्या काही भागांत आढळून येत असल्याने चिंता व्यक्त केली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही याबाबत पुणे महापालिका व राज्य सरकारला संभाव्य संकटाबाबत सतर्क केले आहे.

‘जीबीएस’ या आजाराचे पुण्यात प्रामुख्याने सिंहगड रस्ता परिसरात रुग्ण आढळून येत आहेत. तुलनेने इतर काही भागांतील प्रमाण कमी आहे. हा आजार दुर्मिळ असून ऑटो इम्युन गटातील म्हणजेच स्वत:च्या शरीरावरच हल्ला करणारा लक्षणांचा समूह आहे. हा आजार संसर्गजन्य नाही. या आजारामध्ये एखाद्या व्यक्तीची प्रतिकारशक्तीच त्याच्या शरीरातील नसांवर हल्ला करते. त्यामुळे शरीत कमकुवत होऊ लागते.

शरद पवारांनी या आजाराबाबत चिंता व्यक्त केली आहे. त्यांनी याबाबत सोशल मीडियात पोस्ट करून सरकारला दक्षता घेण्याबाबत सुचित केले आहे. पवारांनी म्हटले आहे की, पुणे शहर आणि शहरालगत काही भाग विशेषतः सिंहगड रस्त्यावरील पुणे मनपामधील नवी समाविष्ट गावांमध्ये नागरीक बाधित झाल्याचे निदर्शनात आले आहे. या दुर्मीळ आजाराची दाहकता लक्षात घेता आणि नागरीकांमध्ये वाढलेले भीतीचे वातावरण ही एक चिंतेची आणि गंभीर बाब म्हणावी लागेल.

दूषित पाण्यातून या आजाराचा प्रदुर्भाव होण्याची शक्यता तज्ञांकडून वर्तवली जात आहे. त्यामुळे पुणे महापालिका प्रशासन व राज्य सरकारने ही परिस्थिती आटोक्यात आणण्याकरीता योग्य ती खबरदारी घ्यावी. संभाव्य संकटाचे अतिदक्षतापू्र्वक योग्य नियोजनातून निराकरण करण्याची भूमिका घ्यावी, अशी अपेक्षा शरद पवारांनी व्यक्त केली आहे.

काय आहेत लक्षणे?

-    श्वसनास त्रास होणे

-    हातापायांना झिणझिण्या येणे

-    रक्तदाबाची समस्या निर्माण होते

-    चालताना अडचण येणे

-    चेहऱ्यावर कमजोरी येणे

-    अतिसार

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT