Walmik Karad : वाल्मिक कराडला दिलासा; न्यायालयाकडून 'ती' मागणी मान्य

CPAP Machine : आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात आणि देशमुख हत्या प्रकरणात मकोका अंतर्गत गुन्हा दाखल झालेल्या वाल्मिक कराड याला बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.
walmik karad
walmik karadsarkarnama
Published on
Updated on

santosh deshmukh case : बीडमधील सरपंच संतोष देशमुख हत्या आणि आवादा कंपनीच्या खंडणी प्रकरणात वाल्मिक कराड याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. त्याच्यावर मोक्का अंतर्गत गुन्हाही दाखल झालेला आहे. आज (ता. 22) कराडला बीडच्या विशेष मकोका न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. याचवेळी कराड यांच्या वकीलांनी केलेली विनंती देखील न्यायालयाने मान्य केली आहे. यामुळे कराडला कोठडीत दिलासा मिळाला आहे.

संतोष देशमुख हत्या प्रकरणात मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल असलेल्या वाल्मिक कराडला स्लीप एपनियाय असल्याचा दावा त्यांच्या वकिलांनी न्यायालयात केला होता. या आजारात झोपेत असतानाच श्वास मार्गात अडथळा निर्माण होण्याची शक्यता असते.

यामुळे CPAP मशीन बाळागावे लागते. तसे न केल्यास जीवावर बेतू शकते असा युक्तीवाद वकिलांनी केला होता. या युक्तीवादावरून न्यायालयाने वाल्मिक कराड यास न्यायालयीन कोठडीत CPAP मशीन देण्याचे आदेश दिले आहेत.

walmik karad
Sushil Walmik Karad : सुशील कराडविरोधातील फिर्याद सोलापूर न्यायालयाकडून नामंजूर; त्या गुन्ह्यासंदर्भात दिला महत्वपूर्ण निर्णय

काय आहे CPAP मशीन ?

CPAP मशीन स्लीप एपनियावर उपचार करण्यास मदत करणारी मशीन आहे. जी नाकातून सतत हवा आत-बाहेर सोडण्यास मदत करते. जेणेकरून झोपतेत ऑक्सिजनची पातळी कमी होण्याची, श्वास गुदमरण्याची शक्यता कमी होते. स्लीप एपनिया आजार असणाऱ्या प्रत्येक वेळी झोपताना तुमचे CPAP मशीन वापरणं आवश्यक आहे. यामध्ये घरी, प्रवास करताना या मशीनचा वापर केला जातो.

walmik karad
Walmik Karad Update : मोठी बातमी : वाल्मिक कराडचा नवा Video समोर, PSI सह चाटे, घुलेही सोबत...

वाल्मिक कराडला देखील स्लीप एपनिया आजार असून त्याला CPAP मशीनची गरज असल्याचे वकिलांनी न्यायालयात सांगितले. त्याप्रमाणे न्यायालयाने वाल्मिक कराडला CPAP मशीन देण्याची मागणीला मान्यता दिली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com