Pune News : पुण्यात काही दिवसापूर्वीच भाजप व काँग्रेसचे कार्यकर्ते समोरासमोर आले होते. त्याचवेळी भाजपच्या कार्यकर्त्यांनी पुण्यातील काँग्रेसभवनासमोर आंदोलन करीत कार्यकर्त्यांवर हल्ला केला. ही घटना ताजी असतानाच आता काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना पुण्यातील मित्र मंडळ चौकात भाजपच्या कार्यकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून मारहाण केल्याचा प्रकार घडला आहे.
काँग्रेस (Congress) पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांच्यावर करण्यात आलेल्या या हल्ल्याचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी निषेध व्यक्त केला आहे. या प्रकरणावरून आता पुण्यातील वातावरण तापण्याची शक्यता आहे.
पुण्यातील मित्र मंडळ चौकात भाजपच्या (BJP) कार्यकर्त्यांनी बंदुकीचा धाक दाखवून काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते हनुमंत पवार यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. हा हल्ला भाजपचे कार्यकर्ते तुषार दामगुडे याने केल्याचा आरोप करण्यात आला आहे. यावेळी तुषार दामगुडे यांनी बंदुकीचा धाक दाखवत पवार यांना मारहाण केली. ही घटना सोमवारी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडली.
या घटनेचा आम्ही निषेध करतो. राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजपचे कार्यकर्ते तुषार दामगुडेना अटक कारवाई, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. याबाबत त्यांनी फेसबुकवर पोस्ट करीत या घटनेचा निषेध केला आहे. या घटनेमुळे वातावरण चांगलेच तापले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.