

शिक्रापूर: लोकसभा व विधानसभा निवडणूकीत पक्षाची झालेली सुमार कामगिरी सुधारण्याच्या उद्देशाने आंबेगाव-शिरुर राष्ट्रवादीने मोठा निर्णय घेतला असून मतदार संघ युवकाध्यक्षपदी करंदी (ता.शिरूर) येथील प्रविण राजेंद्र ढोकले यांची नियुक्ती केली.
निवडीपूर्वी त्यांना दिलेल्या पाबळ-केंदूर जिल्हा परिषद गटाची जबाबदारी त्यांनी यशस्वी पार पाडून तीनही उमेदवार जिल्ह्यात सर्वात उच्चांकी मताधिक्याने विजयी केल्याने ढोकले आता मतदार संघाचे युवक तालुकाध्यक्ष म्हणून काम पाहणार आहेत. याबाबतचे नियुक्तीपत्र ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांनी त्यांना खास निमंत्रित करुन दिले.
सन २००९ मध्ये विधानसभा व लोकसभा मतदार संघाची पुनर्रचना झाल्यानंतर शिरुर तालुक्याची ३९ गावे आंबेगाव-शिरुर विधानसभा मतदार संघाला जोडली गेली आहेत. गेल्या काही दिवसात शिरुर भागात पक्षाच्या युवक संघटनेत बरीच मरगळ आली होती व संघटनाही विस्कळीत झाली होती. त्यामुळे शिरुरमधील पक्षाचे प्रमुख नेते माजी सभापती प्रकाश पवार व उच्चांकी मताधिक्याने विजयी झालेले जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले यांच्या शिफारशीने करंदी (ता.शिरूर) येथील प्रविण राजेंद्र ढोकले यांची तालुकाध्यक्षपदी निवड करण्यात आल्याचे जिल्हाध्यक्ष आण्णा महाडीक यांच्या सहीचे पत्र नुकतेच वळसे पाटील यांनी ढोकले यांना दिले.
नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूकीची पाबळ-केंदूर गटाची विशेष जबाबदारी ढोकले यांच्यावर सोपविली होती. मतदार संघात सर्वात उच्चांकी मतांनी तिनही उमेदवार विजयी झाल्याने ढोकले यांना खास बोलावून त्यांना नियुक्तीपत्र वळसे पाटील यांनी मंचर (ता.आंबेगाव) येथे दिले. यावेळी माजी सभापती प्रकाश पवार, जिल्हा परिषद सदस्य प्रफुल्ल शिवले व शिरुरमधील पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित होते.
प्रविण यांचे वडील हे दिलीप वळसे पाटील यांचे कट्टर समर्थक. त्यांची नियुक्ती कालवा सल्लागार समितीवरही वळसे पाटलांनी केली होती. या कुटुंबाची पक्षनिष्ठा व प्रविण यांनी जिल्हा परिषद-पंचायत समिती निवडणूकीत करुन दाखविलेली कामगिरी याचे जोरावर वळसे पाटील यांनी संपूर्ण मतदारसंघाची मोठी जबाबदारी प्रविण ढोकले यांच्यावर सोपविली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.