Sharad Pawar Harshvardhan Patil Ankita Patil Sarkarnama
पुणे

ZP Election : हर्षवर्धन पाटलांनी डाव टाकला, दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येताच अन् कन्या अंकितासाठी घेतला मोठा निर्णय; उमेदवारी अर्ज...

Harshvardhan Patil Ankita Patil NCP : हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील या जिल्हा परिषद निवडणुकीतच्या मैदानात उतरणार आहेत. त्यांनी तुतारी की घड्याळ या चिन्हापैकी कोणत्या चिन्हावर लढायचे याचा निर्णय घेतला आहे.

Roshan More

Maharashtra Zilla Parishad election update: जिल्हा परिषद निवडणुकीसाठी उमेदवारी दाखल करण्याचा आज शेवटचा दिवस आहे. दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस या निवडणुकीसाठी एकत्र आल्या आहेत. त्यामुळे काही ठिकाणी घड्याळ आणि काही ठिकाणी तुतारी या चिन्हावर लढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयानुसार इंदापूरमधील जागा कोणत्या चिन्हावर लढवल्या जाणार याची उत्सुकता होती.

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते हर्षवर्धन पाटील यांच्या कन्या अंकिता पाटील या पुन्हा जिल्हा परिषद निवडणुकीच्या रणांगणात उतरल्या आहेत. त्यामुळे त्या तुतारीवर लढणार की घड्याळावर याबाबत खल सुरू होता. त्याबाबत महत्वाची बातमी समोर आली असून अंकिता पाटील या घड्याळ चिन्हावर लढणार असल्याचे समोर आले आहे.

दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याने बावडा जिल्हा परिषद गटातून त्या घड्याळ चिन्हावर आपली उमेदवारी दाखल करणार आहेत. आज त्या उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.

दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र आल्याने पुणे जिल्ह्यात अजित पवारांची ताकद वाढल्याची चर्चा आहे. जिल्हा परिषदेवर पुन्हा सत्ता आणण्यासाठी दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्याचे बोलले जात आहे.

श्रीराज भरणे निवडणुकीच्या मैदानात

कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचे पुत्र श्रीराज भरणे हे देखील निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. बोरी पंचायत समिती गणामधून ते आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. भरणे कुटुंबातील दुसरी पिढी या निमित्ताने सक्रीय राजकारणात येणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT