BJP News: भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचा पहिलाच धडाकेबाज निर्णय; महाराष्ट्राच्या दोन 'गेमचेंजर' नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

BJP Politics : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मंगळवारी (ता.20) नितीन नबीन यांच्याकडून पहिली मोठी नियुक्ती करण्यात आली आहे. भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.
BJP Nitin Nabin  .jpg
BJP Nitin Nabin .jpgSarkarnama
Published on
Updated on

BJP News : भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी नुकतीच नितीन नबीन यांची निवड झाली. मंगळवार (20 जानेवारी) त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, मावळते राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या प्रमुख उपस्थित पदभार स्वीकारला. हा पदभार स्वीकारताच नबीन यांच्याकडून पहिली मोठी नियुक्ती करण्यात आली आहे.

भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर मंगळवारी (ता.20) नितीन नबीन यांनी भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह राज्याचे सांस्कृतिक मंत्री आशिष शेलार यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी सोपवली आहे. बिहार निवडणुकीमध्ये तावडे यांनी तर मुंबई महापालिका निवडणुकीत शेलार यांनी केलेल्या चोख कामगिरीनंतर त्यांच्याकडे देशपातळीवर जबाबदारी दिली आहे.

विनोद तावडे यांनी यापूर्वी बिहार राज्याचे प्रभारी म्हणून काम पाहिले होते. आता त्यांची केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच चंदीगड महापौर निवडणुकीसाठी विनोद तावडेंवरच निरीक्षकपदाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

मंत्री आशिष शेलार यांची तेलंगणाच्या स्थानिक स्वराज्य संस्थेत निवडणूक प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याचवेळी संजय उपाध्याय यांची ग्रेटर बेंगलुरू महापालिका निवडणुकीत सहप्रभारी म्हणून नियुक्तीपदाची धुरा देण्यात आली आहे. मुंबईतील विजयानंतर आशिष शेलार आणि संजय उपाध्याय यांना देशपातळीवर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे.

BJP Nitin Nabin  .jpg
PMC Election: पुणे महापालिकेच्या निवडणूक निकालाकडं 57 देशांचं होतं लक्ष! 'या' कामगिरीसाठी राज्यात ठरली एकमेव महापालिका

विनोद तावडे यांच्याकडे 2022 पासून चंदीगड महापौर निवडणुकीसाठी जबाबदारी देण्यात आली आहे. यापूर्वी त्यांच्या नेतृत्वाखाली आकडा कमी असूनही भाजपने चारवेळा बाजी मारली आहे. कधी आम आदमी पक्षाचे नगरसेवक फोडून, कधी निवडणूक अधिकाऱ्याने घातलेल्या घोळामुळे भाजपला यश मिळाले होते. 2024 मधील निवडणूक सर्वोच्च न्यायालयाने रद्द केल्यानंतर एकदा आम आदमी पक्षाचा महापौर बसला होता.

BJP Nitin Nabin  .jpg
BJP-MIM News : भाजपच्या उमेदवाराला नगरपालिकेत एमआयएम अन् काँग्रेसचा पाठिंबा? अकोल्यात झालेली छुपी युती पुन्हा चर्चेत

आता जानेवारी 2026 मध्ये चंदीगड महापौरपदाची निवडणूक होत आहे. या निवडणुकीसाठी भाजपकडे 18 आणि आम आदमी 11 + काँग्रेसकडे 7 अशी 18 मते आहेत. त्यामुळे तावडे यावेळी काय जादू करणार हे बघणे महत्त्वपूर्ण ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com