Ladki Bahin Yojana: पैसे न मिळाल्यामुळे लाडक्या बहिणींचा संताप; आता महायुती सरकारचे योजनेबाबत पुन्हा एकदा महत्त्वाचे नवे आदेश

Minister Aditi Tatkare: काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सोशल मीडियावर महिलांच्या आंदोलनाचा व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर टीकेची झोड उठवली होती. महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठा असंतोष समोर येत आहे.
Ladki Bahin Yojana payment delay
Ladki Bahin Yojana payment delaySarkarnama
Published on
Updated on

Mahayuti government new order on Ladki Bahin Yojana: राज्यात महायुती सरकारनं सुरू केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची अंमलबजावणी सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी अपात्र महिलांनीही लाभ घेतल्याच्या तक्रारी समोर आल्या होत्या. त्यानंतर सरकारनं आधार कार्ड,उत्पन्न प्रमाणपत्र,बँक खाते आणि DBT तपासणी यांच्या आधारे पात्रतेची पडताळणी केली जात आहे.

याच प्रक्रियेचा भाग असलेली लाडकी बहीण योजनेसाठी 31 डिसेंबरपर्यंत ई-केवायसी करण्याची मुदत संपली आहे. त्यानंतर सरकारनं जमा केलेला हफ्ता न मिळाल्यामुळे लाडकी बहीण योजनेबाबत मोठा असंतोष समोर आला होता. यानंतर आता सरकारकडून या योजनेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला आहे.

राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी लाडकी बहीण योजनेसंबंधी महत्वाची अपडेट सोशल मीडियाच्या X वर पोस्ट करत दिली आहे. आता राज्य सरकारने जिल्हा प्रशासनाला महत्त्वाचे आदेश दिले आहेत.

मंत्री आदिती तटकरे यांनी केलेल्या पोस्टमध्ये यात ज्या ठिकाणी काही कारणास्तव योजनेतील महिलांच्या ई केवायसी (e KYC) प्रक्रिया करताना चुका झाल्या आहेत. अशा ठिकाणी जिल्हाधिकाऱ्यांनी पडताळणी करावी अशा सूचना देण्यात आल्याची माहिती दिली आहे.सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी करण्याचेही निर्देश देण्यात आले आहेत.

आदिती तटकरे पोस्टमध्ये म्हणतात, मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजना : महत्वाची सूचना !महाराष्ट्रातील महिलांच्या आर्थिक सक्षमीकरणासाठी, त्यांच्या आरोग्य व पोषणामध्ये सुधारणा करण्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना राबवण्यात येत आहे. या योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी सर्व लाभार्थ्यांना दिनांक ३१ डिसेंबर २०२५ रोजी पर्यंत e-KYC करण्याची मुदत देण्यात आली होती.

Ladki Bahin Yojana payment delay
BJP News: भाजपच्या नव्या राष्ट्रीय अध्यक्षांचा पहिलाच धडाकेबाज निर्णय; महाराष्ट्राच्या 'या' दोन 'गेमचेंजर' नेत्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

तथापि,काही कारणास्तव e-KYC करताना चुकीचा पर्याय निवडण्याची बाब निदर्शनास आली आहे. म्हणूनच, योजनेच्या निकषांनुसार या लाभार्थी महिलांची क्षेत्रीय स्तरावर अंगणवाडी सेविकांमार्फत प्रत्यक्ष पडताळणी (Physical Verification) करण्याच्या सूचना राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आल्याचंही तटकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी 31 डिसेंबरपर्यंत केवायसी करण्याची मुदत संपली आहे. राज्यातील तीस लाख महिलांनी अद्यापही ई-केवायसी प्रक्रिया पूर्ण केलेली नाही. या प्रक्रियेला मुदत वाढ न मिळाल्याने या महिलांचा लाभ आता बंद होणार आहे.

Ladki Bahin Yojana payment delay
PMC Election: पुणे महापालिकेच्या निवडणूक निकालाकडं 57 देशांचं होतं लक्ष! 'या' कामगिरीसाठी राज्यात ठरली एकमेव महापालिका

काँग्रेसच्या नेत्या यशोमती ठाकूर यांनी सोशल मीडियावर महिलांच्या आंदोलनाचा व्हिडिओ पोस्ट करत सरकारवर टीकेची झोड उठवली होती. त्या पोस्टमध्ये ठाकूर म्हणतात, महिलांसाठी सुरू करण्यात आलेल्या लाडकी बहीण योजनेबाबत मोठा असंतोष समोर येत आहे. अनेक महिन्यांपासून खात्यात पैसे जमा न झाल्याने राज्यातील हजारो महिला वैतागल्या असून, अखेर त्यांनी रस्त्यावर उतरून आपला संताप व्यक्त केला आहे. विशेषतः भंडारा आणि यवतमाळ जिल्ह्यांत या योजनेच्या अंमलबजावणीतील त्रुटी उघड झाल्या आहेत.

भंडारा, यवतमाळ जिल्ह्यात नोव्हेंबर २०२५ पासून महिलांच्या खात्यात लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला नाही. राज्यातील बहुतांश लाडक्या बहिणींच्या बँक खात्यावर पैसे आले नाहीत. कुठे नाव गहाळ झाले तर कुठे अपात्र ठरविण्यात आले आहे. केवायसी करूनही पैसे येत नसल्याने महिला संतप्त झाल्या.

Ladki Bahin Yojana payment delay
BJP Politics : महापालिका झाली आता 'ZP'ला महायुती एकत्र येणार की भाजप पुन्हा स्वबळाची ताकद आजमावणार?

भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एकत्र येत राष्ट्रीय महामार्ग जवळपास दीड तास महामार्ग रोखून धरला. तीन-चार दिवसांपूर्वी यवतमाळ जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनीही यवतमाळच्या जिल्हा महिला बालविकास कार्यालयावर धडक दिली होती. निवडणूक आली की, महायुती सरकारला लाडक्या बहिणी आठवतात. निवडणूक संपताच या लाडक्या बहिणींचा विसर पडतो. महायुती सरकारचे हे दुटप्पी धोरण भंडारा जिल्ह्यातील लाडक्या बहिणींनी उघड केले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com