Harshvardhan Patil : शरद पवारांच्या उपस्थितीमध्ये हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षामध्ये प्रवेश केला. या प्रवेश सोहळ्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जयंत पाटील यांनी हर्षवर्धन पाटील यांना उमेदवारी जाहीर केली.
जयंत पाटील म्हणाले, विधानसभेला इंदापूरचा महाधनुष्य हर्षवर्धनभाऊ यांनी हाती घ्यावा. आम्हाला महाविकास आघाडीत अशी उमेदवारी जाहीर करता येत नाही. पण हर्षवर्धन पाटील यांच्या हाती तुतारी आम्ही देणार आहोत. तुम्ही इंदापूरकर हुशार आहात. मी वाळव्यावरून येथे तुम्हाला येऊन सांगण्याची गरज नाही. महाराष्ट्राला मार्गदर्शन करणाऱ्या नेत्यांच्यी गरज त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांचे महत्त्व आमच्या पक्षात आहे.
जयंत पाटील म्हणाले, लोकसभा निवडणुकीच्या आधी हर्षवर्धन पाटील यांना फोन केला होता. त्यांनी आम्ही सांगितले लोकसभेत मदत करा. ते म्हणाले आम्ही त्या पक्षात आहोत. पण शक्य असेल ते आम्ही करू. काही जण आता नाराज आहे. त्यांना जाऊन सांगा ही तुमची आमची लढाई नाही. ही शरद पवारांची दिल्लीश्वरांशी लढाई आहे. त्यांना वाटतंय शरद पवारांना वाकवले तर महाराष्ट्र वाकवता येईल. त्यामुळे शरद पवारांना साथ द्या.
2019 च्या सुरवातीला एक काळ असा होता की आमच्यातील एकएक नेता जात होता. तेव्हा मी सांगत होतो नेते गेले तरी हरकत नाही कारण शरद पवार नावाचं विद्यापीठ आमच्यासोबत आहे. महाराष्ट्रातील जनता छत्रपती शिवाजी महाराजांच्या मागे का राहिली? कारण लढणारा नेता महाराष्ट्राला हवा असतो, असे जयंत पाटील म्हणाले.
लढणाऱ्याच्या मागे मराठी माणसं उभी राहतात. मागच्या काही वर्षात दिल्लीश्वर शरद पवारांना नमवण्याचे आटोकाट प्रयत्न करत होते. सगळे प्रयत्न झाले ईडीची नोटीस आली. त्यांना वाटते शरद पवारांना मोडले तर महाराष्ट्र मोडता येईल म्हणून महाराष्ट्र मोडण्याचा प्रयत्न ते 10 वर्ष करतायेत. त्यामुळे आपल्याला एकएक जागा महत्त्वाची आहे. त्यामुळे शरद पवारांच्यासोबत राहा, असे आवाहन जयंत पाटील यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.