Harshvardhan Patil, Pankaja Munde, Chandrasekhar Bawankule Sarkarnama
पुणे

Pankaja Munde : हर्षवर्धन पाटलांची भाजपला सोडचिठ्ठी, पंकजा मुंडेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाल्या "आमच्या प्रदेशाध्यक्षांशी…"

Jagdish Patil

Pankaja Munde On Harshvardhan Patil : भाजप नेते आणि माजी सहकार मंत्री हर्षवर्धन पाटील यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात (NCP SP) प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. पाटील यांनी भाजपला रामराम करताच भाजपमधील अनेक नेत्यांनी त्यांच्या या निर्णयावर प्रतिक्रिया दिल्या आहेत.

अशातच आता पंकजा मुंडे यांनी देखील हर्षवर्धन पाटील यांनी भाजपची साथ (BJP) सोडायला नको होतं, असं म्हटलं आहे. शिवाय त्यांनी पक्ष सोडण्या संदर्भात प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी चर्चा केल्याचंही म्हटलं आहे.

मागील अनेक दिवसांपासून हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) हे भाजप सोडणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. अखेर आज या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. कारण पाटील यांनी आपण शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याची जाहीर केलं आहे. त्यांच्या या निर्णयामुळे ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का बसला आहे. त्यामुळे त्यांनी पक्ष सोडायला नको होता असं भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी म्हटलं आहे.

पंकजा मुंडे काय म्हणाल्या?

हर्षवर्धन पाटील यांच्या निर्णयावर बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या, "त्यांनी पक्ष सोडायला नको होता. तो त्यांचा वैयक्तिक निर्णय असून त्यांनी तो घेतला आहे. आता त्याबाबत काय बोलणार? माझे आणि त्यांचे वैयक्तिक पातळीवर अतिशय चांगले संबंध आहेत. ते या संदर्भात आमच्या प्रदेशाध्यक्षांशी चर्चा करत होते, त्यामुळे मी काही त्यावर टिप्पणी करू शकत नाही. पण त्यांनी असा निर्णय घ्यायला नको होता."

जनतेचा आवाज, निवडणूक लढवा

तर भाजपला रामराम केल्याचा निर्णय जाहीर करताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, जनतेचा आवाज एकच आहे की मी निवडणूक लढवली पाहिजे. यासाठी मी शरद पवारांना भेटलो त्यांनीही मला सांगितलं की, तुम्ही विधानसभेची निवडणूक लढवली पाहिजे. शिवाय जनतेचा आग्रह आहे तर तुम्ही निर्णय घ्या. बाकी गोष्टीची काळजी मी घेईन, असंही पवार आपल्याला म्हंटल्याचं पाटील यांनी सांगितलं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT