Harshvardhan Patil Sarkarnama
पुणे

Harshvardhan Patil News : हर्षवर्धन पाटील विधानसभेला मोठा निर्णय घेणार, अपक्ष लढणार? इंदापूरमध्ये झळकला 'तो' बॅनर!

Indapur Assembly Election 2024 : इंदापूरमध्ये झळकलेल्या बॅनरमुळे भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे अपक्ष निवडणूक लढवणार का अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

Deepak Kulkarni

Indapur News : लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर राजकीय समीकरणे पूर्णपणे बदलली गेली आहे. निवडणुकीआधी फूल फॉर्म असलेली महायुती काहीशी बॅकफूटला गेली आहे तर महाविकास आघाडीला चांगलाच बूस्ट मिळाला आहे.आघाडीसह महायुतीनेही आगामी विधानसभा निवडणुकांसाठी जोरदार तयारी सुरू केली आहे.

जागावाटपाचा विषय मार्गी लागला नसला तरी आत्तापासूनच महायुती आणि महाविकास आघाडीच्या नेतेमंडळींकडून मित्रपक्षांवर दबावतंत्र निर्माण करण्यासोबतच विधानसभा मतदारसंघावर दावा ठोकण्यास सुरुवात झाली आहे. इंदापूरमध्ये झळकलेल्या बॅनरमुळे भाजप नेते हर्षवर्धन पाटील हे अपक्ष निवडणूक लढवणार का अशी चर्चा जोर धरू लागली आहे.

महायुतीत विधानसभेच्या जागांवरील हेवे-दाव्यांवरुन खटके उडण्याची चिन्हे आहेत. यात इंदापूर मतदारसंघाचाही समावेश आहे. महायुतीतील भाजप नेते हर्षवर्धन पाटील (Harshvardhan Patil) आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे विद्यमान आमदार यांच्यात इंदापूर मतदारसंघावरुन पेच निर्माण होण्याची शक्यता आहे.

विधानसभेच्या 2019 च्या निवडणुकीत भाजप नेते हर्षवर्धन पाटलांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. विशेष म्हणजे सध्या महायुतीतील घटक पक्ष असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या दत्तात्रय भरणेंनीच त्यांचा पराभव केला होता.

मात्र, या पराभवाचा वचपा काढण्यासाठी पाटलांनी आता आक्रमक पवित्रा घेतला आहे. काही करुन यंदा इंदापूरमधून आमदारकी काढायचीच असा होरा त्यांच्या बोलण्यातून अनेकदा दिसून आला आहे.तर दुसरीकडे आमदार दत्तात्रय भरणेही विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी इच्छुक असणार आहे. महायुतीचे वरिष्ठ नेते जो निर्णय घेतील, तो मला मान्य असेल, असं दत्तात्रय भरणे यांनी म्हटलं आहे. 

पण अशातच आता इंदापुरात "आमचा स्वाभिमान आमचे विमान,आमचं आता ठरलंय, तयारी लागा", असा आशय असलेले बॅनर इंदापुरात झळकले आहेत. हे बॅनर भाजप नेते हर्षवर्धन पाटील यांच्या समर्थकांनी लावल्याचे बोलले जात आहे.

महत्त्वाची बाब म्हणजे याआधी हर्षवर्धन पाटील दोनवेळा विमान चिन्हावर अपक्ष निवडणूक लढले आहेत.याच पार्श्वभूमीवर आगामी विधानसभा हर्षवर्धन पाटील अपक्ष लढणार का अशी चर्चा इंदापुरसह (Indapur) पुणे जिल्ह्याच्या राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे.

बारामती लोकसभा मतदारसंघातून उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवारांची उमेदवारी निश्चित झाल्यानंतर महायुतीतील नेत्यांनी बंडाचे निशाण फडणकावण्याचा प्रयत्न केला होता.शेवटी खु्द्द उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी भाजपसह शिंदे गटातील नेत्यांना शांत करत मध्यस्थी करावी लागली.त्यातूनच इंदापूरमध्ये हर्षवर्धन पाटलांनी पुन्हा एकदा अप्रत्यक्षपणे अजित पवारांच्या कार्यपद्धतीवर विश्वास नसल्याचेच स्पष्ट केले होते.

'आधी विधानसभेचा शब्द द्या, नंतरच लोकसभेचे काम करू...'

महायुतीच्या उमेदवाराला इंदापूर भाजपकडून सर्व सहकार्य केले जाईल. मात्र, इंदापूर तालुक्यातील भाजपचे पालकत्व फक्त तुम्हीच स्वीकारावे. या तालुक्यावर भविष्यात अन्याय होणार नाही, याची खबरदारी घ्यावी, असे साकडेच पाटलांनी फडणवीसांना भर सभेत घातले आहे. तर इंदापूरमध्ये विधानसभेत भाजपचा झेंडा फडकावल्याशिवाय राहणार नाही, असे आश्वासनही फडणवीसांना दिले होते. यापूर्वी मात्र अंकिता पाटलांनी देखील आधी विधानसभेचा शब्द द्या, नंतरच लोकसभेचे काम करू, असे जाहीर करत थेट अजित पवारांनाच इशारा दिला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT