Video Sharad Pawar Vs Ajit Pawar : शरद पवारांचा अजितदादांना मोठा धक्का; शहराध्यक्षांसह 16 माजी नगरसेवकांच्या पक्षप्रवेशाचा मुहूर्त ठरला..?

Pimpri Chinchwad NCP Political News : एकीकडे विधिमंडळाचं अधिवेशनाची लगबग सुरू असतानाच आता पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे.
Sharad Pawar, Ajit Pawar
Sharad Pawar, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Mumbai News :अजित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचा एकेकाळी बालेकिल्ला म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पिंपरी-चिंचवडमध्येच शरद पवारांनी अजितदादांना मोठा धक्का दिला आहे.काही दिवसांपूर्वीच पिंपरी-चिंचवडच्या राष्ट्रवादीच्या शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह 16 माजी नगरसेवकांनी पुण्यातील मोदीबागेत शरद पवारांची भेट घेतली होती.

एकीकडे विधिमंडळाचं अधिवेशनाची लगबग सुरू असतानाच आता पिंपरी चिंचवडमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाला मोठं भगदाड पडण्याची शक्यता आहे. लोकसभा निवडणुकीतील निराशाजनक कामगिरीनंतर आता शरद पवारांनी अजित पवार गटाला जोरदार धक्के देण्याची तयारी सुरू केली आहे. याबाबतचे सविस्तर आणि सर्वात पहिले वृत्त साम वृत्तवाहिनीने दिले आहे.

आता त्या माजी नगरसेवकांचा लवकरच शरद पवार गटात प्रवेश होण्याची शक्यता आहे. या सर्व नगरसेवकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांची विधानभवन परिसराबाहेरील एका हॉटेलमध्ये बुधवारी (ता.3) भेट घेतली आहे.

यात अजित पवार गटाचे पिंपरी चिंचवड शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्यासह युवक प्रदेश उपाध्यक्ष विशाल वाकडकर,आणि पिंपरी चिंचवड विधानसभा अध्यक्ष विशाल काळभोर यांचा देखील पक्षप्रवेश आज राष्ट्रवादी कार्यालयात होणार असल्याची माहिती आहे.

लोकसभेच्या निकालानंतर अनेक पदाधिकारी,नेत्यांचा ओढा हा महाविकास आघाडीकडे वळला आहे. ठाकरे गटाने गद्दारांना पक्षात प्रवेश देणार नाही, असे जाहीर केले आहे. तर, शरद पवार गटाकडून काही जणांना प्रवेश दिला जाईल असे स्पष्ट केले होते.

Sharad Pawar, Ajit Pawar
Sanjay Shirsat News : राजकारणापलीकडची मैत्री! काँग्रेसच्या 'त्या' आमदाराची शिंदे गटाच्या नेत्याकडून विचारपूस

शरद पवारांचं मोठं विधान...

माजी नगरसेवकांनी घेतलेल्या भेटीवर शरद पवार Sharad Pawar म्हणाले, पिंपरी चिंचवडमधील काही माजी नगरसेवकांनी माझी भेट घेतली आहे. आजही काही लोक भेट घेणार आहेत. याचा मला आनंद आहे की महाराष्ट्राच्या हितासाठी आपण एकत्र राहून असं त्यांना वाटत आहे. जे काही पूर्वी निर्णय घेतले ते हिताचे नव्हते या निष्कर्षापर्यंत आता ते लोक पोचू लागले आहेत. पक्षांमध्ये येणाऱ्यांचा आम्ही स्वागत करू, असे पवार म्हणाले.

Sharad Pawar, Ajit Pawar
Milind Narwekar News : तुमची मते मिळाल्यानंतर अभिनंदन करा; मिलिंद नार्वेकरांचा मिटकरींना मिश्किल टोला

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com