Pune Heritage News : पुण्याचा ऐतिहासिक वैभव असलेला शनिवारवाडा हा सात मजली करावा अशी मागणी सातत्याने झाल्याचं पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा भाजपा आमदार हेमंत रासने यांनी ही मागणी विधानसभेत केली असून काँग्रेसने पोर्तुगीजांनी उभारलेल्या चर्च संवर्धन केलं मात्र शनिवारवाडा नाही असा आरोप देखील केला आहे.
मराठा साम्राज्याचा झेंडा अटकेपार फडकवणाऱ्या श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या पराक्रमाचे प्रतीक असलेला शनिवारवाडा आज भग्नावस्थेत उभा आहे. 1818 साली लागलेल्या भीषण आगीत या ऐतिहासिक वास्तूचे मोठे नुकसान झाले आणि त्यानंतर वाड्याचे मूळ वैभव हरपले, ही अत्यंत वेदनादायी बाब आहे.
राज्यातील गडकिल्ल्यांचे संवर्धन आणि जतन करण्यासाठी केंद्र व राज्य सरकारकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. त्याच धर्तीवर ऐतिहासिक प्रतीक असलेल्या शनिवारवाड्यालाही पुनर्वैभव प्राप्त करून देण्यासाठी मूळ स्वरूपात सात मजली उभारण्यात यावा, अशी मागणी आमदार हेमंत रासने यांनी विधानसभेत केली आहे. यावेळी बोलताना काँग्रेसच्या सत्ता काळामध्ये पोर्तुगीजांनी उभारलेल्या चर्च चे संवर्धन करण्यात आलं. त्यामुळे आता शनिवारवाडा हा सात मजली झालाच पाहिजे असं हेमंत रासने म्हणाले.
तसेच कसबा मतदारसंघातील विविध प्रश्नांकडे रासने यांनी लक्ष वेधले. यावेळी शनिवारवाडा–स्वारगेट तसेच सारसबाग–शनिवारवाडा या प्रस्तावित भुयारी मार्गांचा सविस्तर प्रकल्प अहवाल (DPR) तातडीने तयार करून पुणे शहरातील पहिला भुयारी मार्ग प्रत्यक्षात आणावा, तसेच मामलेदार कचेरी परिसरात थोर क्रांतिकारक राजे उमाजी नाईक यांच्या राष्ट्रीय स्मारकासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून आवश्यक तरतूद करण्यात यावी, अशी मागणी रासने यांनी केली.
शहराचा मूळ गावठाण भाग असलेल्या कसबा मतदारसंघात शेकडो जुने वाडे आहेत. मात्र युडीसीपीआर नियमावलीतील काही अटींमुळे या वाड्यांच्या पुनर्विकास प्रक्रियेत अनेक अडचणी निर्माण होत आहेत. त्यामुळे येथे राहणाऱ्या नागरिकांना दिलासा देण्यासाठी या नियमावलीत आवश्यक त्या सुधारणा करण्याची गरज आहे.
तसेच मतदारसंघातील महापालिका कर्मचाऱ्यांच्या वसाहतींमधील अनेक इमारती जीर्ण व धोकादायक अवस्थेत आहेत. या पार्श्वभूमीवर नगरविकास विभागाच्या माध्यमातून त्यांच्या पुनर्विकासाचा प्रकल्प तातडीने हाती घेण्याची आवश्यकता असल्याची भूमिका हेमंत रासने यांनी विधानसभेत मांडली.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.