Pune PMC News : होऊ दे खर्च..! पुणे महापालिकेच्या निवडणुकीला दोन महिने उलटत नाही, तोच कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी लाखोंची उधळपट्टी

Pune Municipal Corporation News : पुणे महापालिकेतील पदाधिकाऱ्यांच्या व पक्षनेत्यांच्या कार्यालयांच्या सुशोभिकरणासाठी सुमारे 50 लाख रुपये खर्च केले जात असून सभागृहातील साऊंड सिस्टीम दुरुस्तीसाठीही सुमारे 63 लाखांचा खर्च करण्यात आला आहे.
Public amenity space under Pune Municipal Corporation that may be redeveloped under the proposed BOT model.
Public amenity space under Pune Municipal Corporation that may be redeveloped under the proposed BOT model.Sarkarnama
Published on
Updated on

Pune PMC News : पुणे महापालिकेची निवडणूक होऊन अवघे दोन महिने होत आले असताना आता पदाधिकाऱ्यांची दालने, पक्षनेत्यांची कार्यालयांमध्ये नवीन फर्निचर, सोफा, खुर्ची यासाठी लाखो रुपयांचा उधळपट्टी केली जात आहे. यासाठी सुमारे 50 लाख रुपयांचा खर्च केला जात आहे. दरम्यान, चार वर्ष ही कार्यालये बंद होती, त्यामुळे पदाधिकाऱ्यांच्या मागणीवरून ही कामे केली जात आहेत, असा खुलासा अधिकाऱ्यांनी केला आहे.

महापालिकेत सभागृहनेता, स्थायी समिती, उपमहापौर, सभागृह येथे किरकोळ काम करण्यात आले आहे. काँग्रेस, ठाकरेंची शिवसेना, विषय समित्यांच्या कार्यालय येथे मोठ्या प्रमाणात काम केले जात आहे.

यामध्ये नव्याने फर्निचर करणे, कार्यालयांचे रंगकाम, अंतर्गत दुरुस्ती तसेच कुशन बदलणे यांचा समावेश आहे. महापालिकेत पदाधिकारी बदलले की त्यांच्या कार्यालयांचे रुपडेही बदलून जाते. हीच पद्धत आता पुन्हा एकदा सुरु झालेली आहे.

Public amenity space under Pune Municipal Corporation that may be redeveloped under the proposed BOT model.
PMC News : पुणे महापालिकेच्या सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पुन्हा अचानक कामावर बोलावलं! नेमकं काय घडलं? जाणून घ्या

सभागृहातील साऊंड सिस्टीमसाठी 63 लाखाचा खर्च

महापालिकेच्या नव्या विस्तारित इमारतीतील मुख्य सभागृहात असलेल्या डिजिटल ऑडिओ कॉन्फरन्स सिस्टीमच्या देखभाल व दुरुस्तीसाठी सुमारे 62 लाख 85 हजार 701 रुपये खर्च करण्यात आले आहेत. या कामामध्ये मायक्रोफोन, वायरलेस मायक्रोफोन, अॅम्प्लिफायर, डिस्ट्रिब्युशन यंत्रणा, स्पीकर्स तसेच ऑडिटोरियममधील ऑडिओ सिस्टीमचे सर्व्हिसिंग यांचा समावेश आहे.

Public amenity space under Pune Municipal Corporation that may be redeveloped under the proposed BOT model.
Pune-Pimpri Development Projects : पुणे-पिंपरीच्या वेगाला आता ब्रेक नाही! मुख्यमंत्र्यांचा मोठा शब्द, 'निधी कमी पडू देणार नाही'; नेमके कोणते प्रकल्प मार्गी लागणार?

याशिवाय सुमारे 2 कोअर शिल्डेड वायर आणि 1.5 स्क्वेअर मिमी स्पीकर वायर बसविण्याचे कामही करण्यात येत आहे. या कामासाठी विद्युत विभागाने सुमारे 63 लाख 84 हजार रुपयांचे अंदाजपत्रक तयार केले होते. मात्र सभागृहातील ही यंत्रणा काही वर्षांपूर्वीच बसविण्यात आली असतानाही पुन्हा एवढा मोठा खर्च केला जात आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com