पुणे : "हिंदूत्व" कुणाचे खरे अन् कुणाचे पोकळ यावरुन सध्या मनसे-शिवसेनत (shivsena) वाद रंगला आहे. "हिंदूत्व" या मुद्दांवरुन मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (raj thackeray) हे आक्रमक झाल्यानंतर शिवसेनेने देखील या विषयावर आपली भूमिका स्पष्ट करण्यास सुरवात केली आहे. आज राज ठाकरे यांची पुण्यात सभा झाली. या सभेत त्यांनी शिवसेना, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हिंदुत्वावर प्रहार केला. (raj thackeray latest news)
"या सर्वांचं हिंदूत्व ढोंगी आहे.त्यांचं हिंदूत्व पोकळ आणि आमचं हिंदूत्व रिझल्ट देणार आहे. खरं हिंदूत्व आणि खोटं हिंदूत्व, हे काय वॉशिंग पावडर आहे का," असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला.
"मुख्यमंत्र्यांची सभा झाली. काय पोरकटपणा चालू आहे मला कळतच नाही. आमचं खरं हिंदुत्व, यांचं खोटं हिंदुत्व. वॉशिंग पावडर विकताय का तुम्ही? तुम्हारी कमीज हमारी कमीजसे सफेद कैसे? प्रश्न रिझल्ट्सचा आहे. जे आम्ही देतो," असे राज ठाकरे म्हणाले.
शिवसेनचे खासदार संजय राऊत, राणा दांपत्य यांच्यावरही राज ठाकरे यांनी निशाणा साधला. "आपल्याविरोधात सगळे एकत्र येतात. अन्यथा भांडत असतात,ज्यांना आपलं हिंदुत्व झोंबलं, भोग्यांविरुद्ध लाऊडस्पीकर झोंबले, राणा दाम्पत्य उठलं आणि मातोश्रीवर जाऊन हनुमान चालीसा म्हणणार, मातोश्री काय मशिद आहे का? मग त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, जेल झाली, मग मधू इथे आणि चंद्र तिथे. त्यानंतर लडाखमध्ये शिवसेना नेते संजय राऊत आणि नवनीत राणा आणि रवी राणा हे राणा दाम्पत्य सोबत जेवताना दिसले. हे सर्व ढोंगी आहेत. यातून चुकीचे पायंडे पडत आहेत,"
राज ठाकरे यांचा अयोध्या दौरा स्थगित झाला आहे. या दौऱ्याला भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी विरोध केला. राज यांनी परप्रांतियांची माफी मागावी, असे ब्रिजभूषण सिंह म्हणाले होते. त्यावर राज ठाकरे म्हणाले,"गुजरातमधून हजारो परप्रांतियांना हाकलून दिले, कोण माफी मागणार? माफी मागायला गेली 15 वर्षे झोपले होता का? त्यांना आपलं हिंदूत्व झोंबले, बाकी काही नाही. हनुमानचालिसावरुन शिवसेना आणि राणा दाम्पत्यामध्ये राडा झाला, त्यानंतर हे लडाखमध्ये एकत्र दिसले. या सर्वांचं हिंदूत्व ढोंगी आहे."
"मी अयोध्या दौरा तूर्तास स्थगित केल्यानं अनेकांना वाईट वाटलं, काही जणांनी कुत्सितपणे प्रतिक्रियाही दिल्या, अयोध्या दौऱ्याच्या निमित्तानं एक सापळा रचला गेला, त्याला रसद महाराष्ट्रातून पुरवली गेली," असा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी आजच्या सभेत केला.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.