<div class="paragraphs"><p>Amit Shah-Murlidhar Mohol</p></div>

Amit Shah-Murlidhar Mohol

 

Sarkarnama 

पुणे

महापौर मोहोळांनी अमित शहांना पुणे पालिकेत आणलेच!

सरकारनामा ब्यूरो

पुणे : केंद्रीय सहकार आणि गृहमंत्री अमित शाह (Amit Shah) येत्या रविवारी पुणे दौऱ्यावर असून या दौऱ्यात ते पुणे महापालिकेत (PMC) पहिल्यांदाच भेट देणार आहेत. शाह यांच्या हस्ते हिरवळीवरील छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारकाचे भूमिपूजन आणि वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे लोकार्पण होणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली.

पुणे महापालिकेच्या हिरवळीवर महापौर मोहोळ यांच्या संकल्पनेतून छत्रपती शिवाजी महाराजांचे सिंहासनाधिष्ठ पुतळा स्मारक साकारण्यात येत आहे. तर भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा नवीन इमारतीच्या प्रवेशद्वाराजवळ बसविण्यात येत आहे. हे दोन्ही कार्यक्रम गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते येत्या रविवारी दुपारी तीन वाजता होणार आहे.

महापौर मोहोळ यांनी या कार्यक्रमाची माहिती दिली.ते म्हणाले, ‘‘ दोन्ही कार्यक्रमास केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री रामदास आठवले, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमाच्या निमित्ताने केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री शाह पहिल्यांदाच पुणे महापालिकेत येत असल्याचा विशेष आनंद आहे.’’

हिंदवी स्वराज्य संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज आणि वंदनीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर या दोन्ही महापुरुषांनी आपणा सर्वांनाच दिशा दिलेली आहे. दैनंदिन जीवनात काम करत असताना या दोन्ही महापुरुषांनी घालून दिलेल्या मार्गावरून वाटचाल करणे प्रेरणादायी आहे. म्हणूनच महापालिका म्हणून पुणेकरांसाठी काम करत असताना या दोन्ही महापुरुषांचे पुतळे असावेत, ही मनोमन इच्छा होती. जी आता पूर्णत्वास जात असताना मनस्वी समाधान आहे, असे मोहोळ यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT