आमदार सातपुतेंची तोफ आता गोव्यात धडाडणार !

गोवा राज्याची विधानसभा निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे
आमदार राम सातपुते

आमदार राम सातपुते

सरकारनामा

Published on
Updated on

नातेपुते : गोवा विधानसभा निवडणूक प्रचार समितीत भारतीय जनता युवा मोर्चाचे (BJUM) राष्ट्रीय उपाध्यक्ष आमदार राम सातपुते (Ram Satpute) यांची निवड करण्यात आली आहे.

<div class="paragraphs"><p>आमदार राम सातपुते</p></div>
पुणे भाजपचे रणशिंग फुंकण्यासाठी अमित शहांचा दौरा ठरला..

गोवा राज्याची विधानसभा निवडणूक प्रक्रिया लवकरच सुरु होणार आहे.त्यासाठी तेथील वेगवेगळ्या मतदारसंघासाठी प्रचार समिती स्थापन करण्यात आली आहे. या समितीत आमदार राम सातपुते यांची निवड करण्यात आली आहे.विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे गोवा निवडणुकीत प्रभारी आहेत. त्यांनी या निवडणुकीसंबंधी महाराष्ट्रातील प्रमुख नेते व कार्यकर्ते यांची फळी तयार केली असून त्यांची बैठक घेतली आहे.

<div class="paragraphs"><p>आमदार राम सातपुते</p></div>
राज ठाकरेंचा पुणे दौरा निवडणुकीची दिशा ठरवणार ?

निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला तेथे मदत व्हावी व पक्षाची सत्ता पुन्हा यावी यासाठी विविध नियोजन केले जात आहे. त्याचाच एक भाग म्हणून महाराष्ट्रातील भाजपाचे आमदार, पदाधिकारी यांच्यावर वेगवेगळ्या मतदारसंघाच्या संदर्भात निवडणूक प्रचार प्रक्रियेत सहभाग राहणार असल्याने ही निवड करण्यात आली आहे. या निवडणुकीतील प्रचार समितीची ‘ऑनलाइन’ बैठक विरोधी पक्षनेते तथा गोवा निवडणुकीचे प्रभारी देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये झाली. या बैठकीस महाराष्ट्र भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, गोवा प्रदेशाध्यक्ष सदानंद तानावडे आदी उपस्थित होते.

आमदार राम सातपुते हे विद्यार्थ्यांच्या, शेतकऱ्यांच्या आणि जनतेच्या हितासाठी वेळोवेळी घेत असलेल्या चांगल्या आणि आक्रमक भूमिकेमुळे नेहमी चर्चेत असतात. कामाची पद्धत आणि नेतृत्वशैली, माळशिरस मतदार संघातील काम आणि भाजपा युवा मोर्चाचे उपाध्यक्ष म्हणून देशभर केलेला प्रवास, तेथील कामाचा व अनुभवाचा गोवा निवडणुकीमधील उमेदवारांना देखील लाभ व्हावा या हेतूने ही निवड करण्यात आली आहे.

Edited By : Umesh Ghongade

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com