पुणे : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे उद्यापासून तीन दिवसांच्या पुणे दौऱ्यावर येत आहेत. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या दृष्टीकोनातून पक्षाच्या तयारीचा भाग म्हणून हा दौरा असून या दौऱ्यात ठाकरे शहरातील सर्व विधानसभा मतदारसंघनिहाय बैठका घेणार आहेत.
महानगरपालिका निवडणूक समोर ठेऊन सर्वच राजकीय पक्षांनी तयारी सुरू केली आहे. प्रभाग रचना अंतीम टप्प्यात आहे. येत्या काही दिवसात प्रभागांचे अंतीम चित्र स्पष्ट होईल.या पाश्र्वभूमीवर ठाकरे यांचा हा दौरा पक्ष कार्यकर्त्यांसाठी महत्वाचा आहे. शहरात मनसेची ताकद चांगली आहे.एकेकाळी पक्षाचे तब्बल २९ नगरसेवक निवडून आले होते. पक्ष महापालिकेत विरोधी बनला होता.मात्र, गेल्या निवडणुकीत पक्षाचे केवळ दोनच नगरसेवक निवडून येऊ शकले.
चार सदस्यीय प्रभाग झाल्याचा सर्वाधिक फटका गेल्यावेळच्या निवडणुकीत मनसेला बसला.दोन सदस्यांचा प्रभाग मनसेसाठी अधिक सोयीचा आहे.यावेळी तीन सदस्यांचा प्रभाग असल्याने मनसेला काही प्रमाणात आशा आहे.हडपसर, कोथरूड व कसबा या तीन विधानसभा मतदारसंघात मनेची ताकद आहे.या तीन मतदारसंघात अधिक लक्ष घालून पालिकेतील ताकद वाढविण्याची तयारी मनसेने सुरू केली आहे.
शहरात मनसेची ताकद शिवसेनेच्या बरोबरीने आहे. मात्र, चार सदस्यीय प्रभाग रचनेचा फटका बसल्याने गेल्यावेळी पक्षाला दोन नगरसेवकांपर्यंतच मजल मारता आली. शिवसेनेची ही संख्या दहापर्यंत पोचली. बदललेली राजकीय समीकरणे व वातावरणाचा फायदा घेत या निवडणुकीत पुन्हा एकदा स्वत:ला सिद्ध करण्याची संधी मनसे शोधत आहे.
भारतीय जनता पार्टीशी युती करण्याची चर्चा गेल्या महिन्यात सुरू झाली आहे. पुण्यात युती झाली तर पक्षाला फायदा होईल, अशी कार्यकर्त्यांची भावना आहे. मात्र, युतीची चर्चा सुरू होताच पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी सबुरीने घेण्याचा सल्ला नेते व कार्यकर्त्यांना दिल्याचे तूर्त ही चर्चा थांबली आहे.
Edited By : Umesh Ghongade
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.